लोकमततर्फे भारत-पाक शांतिप्रक्रियेवर चर्चासत्र

By Admin | Updated: June 3, 2016 07:55 IST2016-06-03T03:25:57+5:302016-06-03T07:55:32+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत ‘भारत अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Conference on Indo-Pak peace process by Lokmat | लोकमततर्फे भारत-पाक शांतिप्रक्रियेवर चर्चासत्र

लोकमततर्फे भारत-पाक शांतिप्रक्रियेवर चर्चासत्र

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत ‘भारत अ‍ॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे सायंकाळी ४ वाजता हे चर्चासत्र होणार आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतीप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित हे मुख्य वक्ता असतील. याशिवाय थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी व काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी आपले मत व्यक्त करतील.

यावेळी प्रेक्षकांसोबत या दिग्गजांचे प्रश्नोत्तराचे सत्र होईल. भारत-पाकिस्तानच्या वर्तमान संबंधांबाबत नागरिकांना ऐकायचे व समजून घ्यायचे आहे. ६९ वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या भारत-पाक या दोन भावांनी एकमेकांशी प्रेमाने राहावे, असे दोन्ही देशातील लोकांना वाटते. त्यामुळेच या दोन्ही देशात सुरू असलेल्या शांतीप्रक्रियेवर जनतेचे बारीक लक्ष असते. त्याच पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होत असल्यामुळे नागरिकांना याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Conference on Indo-Pak peace process by Lokmat