प्रवाशांना मिळणार सौजन्यपूर्ण वागणूक
By Admin | Updated: June 4, 2015 04:37 IST2015-06-04T04:37:12+5:302015-06-04T04:37:12+5:30
उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचाच एक भाग महामंडळाने ‘प्रवासी सौजन्य सप्ताह’ उपक्रम राबविण्याचे

प्रवाशांना मिळणार सौजन्यपूर्ण वागणूक
मुंबई : उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचाच एक भाग महामंडळाने ‘प्रवासी सौजन्य सप्ताह’ उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि
मार्च २0१६ या महिन्यांत हा
सप्ताह राबविण्याचा निर्णय झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
सध्या एसटी तोट्यात असून भारमानही फारच कमी आहे. हे पाहता अधिकाधिक प्रवासी एसटीकडे आकर्षित व्हावेत, यादृष्टीने महामंडळाकडून गेल्या काही वर्षांत अनेक उपक्रम राबविण्यात आले. अनेक उपक्रमांनंतर आता प्रवासी सौजन्य सप्ताह राबविण्यात येणार असून, पहिला सौजन्य सप्ताह ८
ते १४ जूनदरम्यान साजरा करण्यात येणार आहे.
त्यानंतर हा सप्ताह सप्टेंबर, डिसेंबर, मार्च महिन्याच्या २१ ते २७ तारखेदरम्यान राबविण्यात येईल. या कालावधीत प्रत्येक स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार असून, प्रवाशांना शुभेच्छा देण्यात येतील. प्रवाशांना हवी असलेली माहिती अत्यंत सौजन्यपूर्ण भाषेत देण्यात येईल. तसेच सप्ताहाबाबत प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी प्रत्येक स्थानकात नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्यातील नकारात्मक प्रतिक्रियांची नोंद वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार असून संबंधितास प्रथम मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात येईल. वागणुकीत सुधारणा न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. या सप्ताह कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थानकांनाही भेट देतील.