उपोषणकत्र्याची प्रकृती खालावली

By Admin | Updated: July 27, 2014 00:09 IST2014-07-27T00:09:59+5:302014-07-27T00:09:59+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बारामतीत सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाच्या 6व्या दिवशी उपोषणकत्र्याची प्रकृती ढासळली.

The condition of the hunger strike decreased | उपोषणकत्र्याची प्रकृती खालावली

उपोषणकत्र्याची प्रकृती खालावली

बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या  आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बारामतीत सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाच्या 6व्या दिवशी उपोषणकत्र्याची प्रकृती ढासळली. वैद्यकीय अधिका:यांकडून त्यांची तपासणी सातत्याने केली जात आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महायुतीच्या खासदार, आमदारांनी हजेरी लावली. त्याचबरोबर राज्यभरातील विविध पदाधिका:यांनी बारामतीत येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. 
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज उपोषणकत्र्याची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा दिला आहे. 
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ या समाजाचा मतांसाठी वापर केला. आता आरक्षणाची अंमलबजावणी आघाडी सरकार करीत नसेल, तर त्यांना खडय़ासारखे सत्तेतून बाहेर काढा. राज्य सरकारने चर्चेचे गु:हाळ थांबवून आरक्षणाची थेट अंमलबजावणी करावी. राज्य व केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतल्यास आरक्षणाच्या अंमलबजावणीस कोणताही अडथळा येणार नाही. धनगर आणि धनगड या शब्दांमधील ‘र’ आणि ‘ड’ची गफलत करून धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीची अडवणूक करणारा झारीतील शुक्राचार्य कोण? त्यांना सत्तेतून बाहेर फेकणो गरजेचे आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत लेखी ‘वचन’ दिले आहे. ते वचन आम्ही पाळणार, असे त्यांनी सांगितले. 
शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी या प्रश्नी शिवसेना आंदोलनात उतरेल, असा इशारा दिला. आमदार भारत भालके यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच आंदोलनासाठी 51 हजार रुपयांची मदत दिली. आमदार जयकुमार गोरे यांनीदेखील 1 लाख रुपयांची देणगी देऊन धनगर समाजाला राज्यघटनेने आरक्षण दिले आहे. मी कॉँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य आहे. ज्या समाजाच्या मतांवर आमदार म्हणून काम करता आले, त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असल्याचे त्यांनी जाही केले. 
भाजपाचे आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची आपली तयारी आहे. आज आरक्षण प्रश्नी राज्यातील तरुण एकवटला आहे. सर्वपक्षीय नेते एका मंचावर आले आहेत. त्यामुळे राज्य सरकाराला आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी ‘एकच मागणी आरक्षणाची अंमलबजावणी’ असा नारा दिला. त्याला तरुणांनी जोरदार प्रतिसाद दिला.  या वेळी अॅड. जी. बी. गावडे, प्रा. राजाराम गावडे, नारायण पाटील, अविनाश मोटे, दशरथ राऊत, 
गणपत आबा देवकाते, बसपाचे काळूराम चौधरी आदींची भाषणो झाली. आदिवासी नेत्यांच्या माध्यमातून विरोध केला जात आहे, असा आरोप केला. (प्रतिनिधी)
 
4आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारने ठोस पावले न उचलल्यास उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तरूण कार्यकत्र्यानी दिला. याचबरोबर, कृती समितीच्या नेत्यांनीदेखील चर्चेसाठी आता जास्त वेळ देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे आजच्या निर्णयावर सर्व अवलंबून आहे. आंदोलन तीव्र होणार असल्याची कुणकुण लागल्याने पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या जवानांनादेखील पाचारण करण्यात आले आहे. 
 
उपोषणकत्र्याचे 
वजन घटले.. 
आज 16 उपोषणकत्र्याची प्रकृती खालाविली. त्यांचे वजन घटले. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये देखील अस्वस्थता वाढली. उपोषणकत्र्याची सातत्याने वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये, यासाठी कार्यकत्र्यानीच काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिका:यांनी केले. 
 
आमदार थोरात यांना विरोध 
दौंडचे आमदार रमेश थोरात पाठिंबा देण्यासाठी भाषणाला उभे राहिले; मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ यांनी त्यांचे भाषण थांबवून 2क्क्9मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आपण प्रय} करू, असे आश्वासन दिले होते. मागील 5 वर्षात यावर आपण एकही शब्द काढला नाही, असा आक्षेप घेतला. त्याला उपस्थित कार्यकत्र्यानी प्रतिसाद दिला. थोरात यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रय} केला. परंतु, कार्यकत्र्याच्या गोंधळामुळे आंदोलनाला पाठिंबा देऊन ते निघून गेले. 
 

 

Web Title: The condition of the hunger strike decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.