वाइनसाठी स्थिती अनुकूल - देसाई

By Admin | Updated: January 24, 2016 00:51 IST2016-01-24T00:51:24+5:302016-01-24T00:51:24+5:30

महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र वाइन उत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली.

Condition favorable for wine - Desai | वाइनसाठी स्थिती अनुकूल - देसाई

वाइनसाठी स्थिती अनुकूल - देसाई

मुंबई : महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र वाइन उत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली. हॉटेल ताज लँडस येथे वाइन फेस्टिवलचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, ‘महाराष्ट्रातील साधनसंपत्ती, दळणवळणाच्या सुविधा, कृषी क्षेत्रावरील आधारित उद्योग हे फळप्रक्रिया उद्योगांसाठी अनुकूल आहेत. त्यामुळे बाहेरच्या देशातील उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या वेळी देशातील व विदेशातील वाइन उत्पादक उपस्थित होते.

Web Title: Condition favorable for wine - Desai