शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:08 IST

अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग

सांगली : अलमट्टी धरण जून महिन्यात ४७ टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जलआयोगाने परवानगी दिली आहे; पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा ठेवून जलआयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जलआयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर म्हणजेच ४७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. असे असतानाही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १५ जून रोजी धरणात ६४.०३ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, ५२ टक्के धरण भरले आहे. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. येत्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अलमट्टी धरण ५२ टक्के भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग आहे. मान्सूनचा जोर वाढल्यानंतर येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अलमट्टी धरणाचे अधिकारी कसे करणार आहेत, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय : चंद्रशेखर पाटाेळेपावसाळा सुरू झाल्यापासून कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. आपल्या पाटबंधारे विभागाचे अधिकारीही तिथे नियुक्त केले आहेत. जून महिन्यात अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४७ टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे; पण त्यांनी त्यापेक्षा जास्त ठेवल्याबद्दल अलमट्टी येथील अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. ते पाण्याचा विसर्ग वाढवतील, असा विश्वासही पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.

अलमट्टी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय जलआयोगाच्या नियमांचे पालन केले नाही. ४७ टक्के पाणीसाठा ठेवण्याऐवजी ५२ टक्के पाणीसाठा ठेवला आहे. याबद्दल राज्य सरकारने कर्नाटक सरकारला नोटीस काढली पाहिजे. तसेच केंद्रीय जलआयोगाकडेही तक्रार केली पाहिजे. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे केंद्रीय जलआयोगाकडे तक्रार करणार आहे. -सर्जेराव पाटील, निमंत्रक, कृष्णा महापूर नियंत्रण समिती