टीबीमुक्त विदर्भाची संकल्पना राबवा -नितीन गडकरी
By Admin | Updated: July 8, 2016 19:18 IST2016-07-08T19:18:23+5:302016-07-08T19:18:23+5:30
ढत्या क्षयरोगाला आळा घालण्यासाठी टीबीमुक्त विदर्भ अशी संकल्पना राबवावी. यासाठी जे सहकार्य आवश्यक आहे, ते उपलब्ध करून दिले जाईल.

टीबीमुक्त विदर्भाची संकल्पना राबवा -नितीन गडकरी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ८ : वाढत्या क्षयरोगाला आळा घालण्यासाठी टीबीमुक्त विदर्भ अशी संकल्पना राबवावी. यासाठी जे सहकार्य आवश्यक आहे, ते उपलब्ध करून दिले जाईल. तसेच मोबाईल सीबी-नॅट मशीनची संकल्पना प्रत्यक्षात उतरणेही महत्त्वाचे आहे. यामुळे विविध शिबिरांमधून व शाळांमधून जास्तीत जास्त क्षयरोगाच्या रुग्णांचे निदान होऊ शकेल. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने मोठा धोका टळू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
राज्य क्षयरोग प्रशिक्षण प्रात्यक्षिक केंद्र, नागपूर यांच्यावतीने मेडिकलच्या क्षय व छातीरोग विभागात स्थापन केलेल्या जीन एक्सपर्ट (सीबीनॅट) मशीनच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते गडकरी म्हणाले, टीबी कार्यक्रमामध्ये साामजिक कार्यकर्त्यांची मदत घेणे आवश्यक आहे. यामुळे यात पारदर्शकता येईल, सोबतच जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळेल. क्षयरोगाशिवाय सिकलसेल हा नागपूरसह विदर्भासाठी मोठा प्रश्न आहे. यातील संशोधनासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे.