तर व्यापक हितासाठी तडजोड

By Admin | Updated: August 17, 2014 01:16 IST2014-08-17T01:16:31+5:302014-08-17T01:16:31+5:30

व्यापक हितासाठी तडजोड करु, काही जागा कमी झाल्या तरी स्वीकारू, अशी भूमिका शरद पवार यांनी पुण्यात शनिवारी जाहीर केली़

Compromise for comprehensive welfare | तर व्यापक हितासाठी तडजोड

तर व्यापक हितासाठी तडजोड

>पुणो : विधानसभेसाठी 144 जागांची मागणी आम्ही सोडलेली नाही़ मात्र, प्रत्येक जागेवर कोण जिंकू शकतो हे वास्तव चित्र लक्षात ठेवून जागावाटपाचा निर्णय घ्यावा लागेल़ व्यापक हितासाठी तडजोड करु, काही जागा कमी झाल्या तरी स्वीकारू, अशी भूमिका शरद पवार यांनी पुण्यात शनिवारी जाहीर केली़ 
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, दिल्लीत 19 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे ए़ के. अँथनी, अहमद पटेल, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आपली बैठक होणार असून, त्यात निर्णय घेतला जाईल़ दुस:या दिवशी जागावाटपाच्या बोलणीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलावले आह़े काँग्रेसकडूनही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलावले जाऊ शकत़े, असे पवार म्हणाल़े 
राज्य शासनाविरोधात लोकांमध्ये असंतोष असल्याच्या आरोपांचा इन्कार करुन पवार म्हणाले, 1995 ते 1999 या काळात युतीचा राज्य कारभार पाहिल्यानंतर जनतेने त्यांना पुन्हा संधी दिलेली नाही़ 2क्क्4 आणि 2क्क्9 मध्ये असेच म्हटले जात होत़े प्रत्यक्षात आघाडीची पुन्हा सत्ता आली़ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती वेगळी असत़े त्यामुळे लोकसभेत जे घडले ते विधानसभेत घडेलच असे नाही, असा दावा पवार यांनी केला़ (प्रतिनिधी) 
 
धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा
धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेशाच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून, त्यांना आदिवासींप्रमाणो सर्व सुविधा मिळाव्यात़ मात्र, त्यांचा तिस:या सूचीतील समावेशाला पवार यांनी विरोध दर्शविला आह़े आदिवासींच्या हक्काला धक्का न बसता धनगर समाजाला आरक्षण देण्यास मधुकर पिचड यांची हरकत नसल्याचे पवार म्हणाल़े हा अधिकार केंद्र सरकारला आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यावर निर्णय घेण्याची विनंती आपण केल्याचे त्यांनी सांगितल़े या आरक्षणाला भाजपा नेत्यांचाही पाठिंबा आह़े त्यामुळे सत्तारुढ पक्षाने त्याचा निर्णय घ्यायचा आह़ेधनगर आरक्षणाचा विषय ससंदेत येईल, तेव्हा आमचे संख्याबळ कमी असले तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली़   
 
पाचपुतेंचा आरोप हा पक्षावर अन्याय
बबनराव पाचपुते यांना पक्षाने अनेक पदे दिली. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा त्यांचा आरोप हा पक्षावरच अन्याय करणारा आहे, असे  पवार यांनी सांगितले. थकबाकीदार साखर कारखाना असताना नियम डावलून मदत न दिल्याने त्यांचा माङयावर राग आहे, असे पवार म्हणाल़े तीन वर्षे प्रदेशाध्यक्ष पद आणि नऊ वर्षे मंत्रिपद दिले, शिवाय निवडणूकविषयक कोअर कमिटीच्या 12 सदस्यांमध्ये त्यांचा समावेश केला होता़ त्यामुळे पाचपुते यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे पवार म्हणाल़े 
 

Web Title: Compromise for comprehensive welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.