संगीतकार रवींद्र जैन यांची प्रकृती स्थिर
By Admin | Updated: October 8, 2015 03:30 IST2015-10-08T03:30:45+5:302015-10-08T03:30:45+5:30
ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांना बुधवार, ७ आॅक्टोबर रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल

संगीतकार रवींद्र जैन यांची प्रकृती स्थिर
मुंबई: ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांना बुधवार, ७ आॅक्टोबर रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूरहून लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले.
जैन यांच्या फुप्फुस, किडनीला संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असली, तरीही स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.