कुंभमेळ्याच्या आयोजनाचे अमेरिकेत कौतुक
By Admin | Updated: October 13, 2015 03:47 IST2015-10-13T03:47:53+5:302015-10-13T03:47:53+5:30
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट’ मीडिया लॅब (केंब्रिज) या संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

कुंभमेळ्याच्या आयोजनाचे अमेरिकेत कौतुक
मुंबई : नाशिकमधील कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट’ मीडिया लॅब (केंब्रिज) या संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. बोस्टन येथे आयोजित ‘कुंभथॉन’ परिषदेसाठी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे.
२६ आणि २७ आॅक्टोबरला ही परिषद होणार आहे. मुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांना परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री या परिषदेस उपस्थित राहू शकणार नसल्याने महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ परिषदेत सहभागी होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)