३१ मेपर्यंत शहरातील सर्व कामे संपवा

By Admin | Updated: May 18, 2015 04:32 IST2015-05-18T04:32:10+5:302015-05-18T04:32:10+5:30

शहर व पूर्व-पश्चिम उपनगरात सुरु असलेली नालेसफाईसह रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता

Complete all the city tasks by May 31 | ३१ मेपर्यंत शहरातील सर्व कामे संपवा

३१ मेपर्यंत शहरातील सर्व कामे संपवा

मुंबई : शहर व पूर्व-पश्चिम उपनगरात सुरु असलेली नालेसफाईसह रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. पश्चिम उपनगरातील नाल्यासंह रस्त्यांच्या कामांच्या केलेल्या पाहणीदरम्यान आयुक्त बोलत होते. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे (पूर्व) येथील चामडावाडा नाला, इर्ला नाला, जुहू एअरपोर्ट, मोगरा नाला, ओशिवरा नदी, लिंक रोड, शास्त्रीनगर नाला, गोरेगाव येथील पिरामल नाला व इन आॅरबिट मॉलसमोर लिंक रोड येथे सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी करण्यात आली. तसेच जेव्हीपीडी जंक्शन, अंधेरी (पश्चिम), गोरेगाव स्पोर्टस क्लब, टोयाटो शोरुम समोर व मिंट चौकी जंक्शन, मालाड (पश्चिम) येथे सुरु असलेल्या चौक व रस्त्यांच्या कामांचीही पाहणी यावेळी करण्यात आली. नाल्यांमध्ये आढळून येणाऱ्या तरंगत्या वस्तू गोळा करुन त्याचीही त्वरित विल्हेवाट लावावी, असे निर्देशही आयुक्तांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिले
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Complete all the city tasks by May 31