शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

राज्यात ‘आधार’ची ९४ टक्के नोंदणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:45 AM

पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या नोंदणीकडे अधिक लक्ष : अंगणवाडी सेविकांची प्रशासन घेणार मदत

- खलील गिरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांची ९४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली असून, नवजात बालक ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने, हे प्रमाण वाढविण्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९४ टक्के नागरिकांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे प्रमाण १०७ टक्के, ५ ते १८ वयोगटांतील व्यक्तींचे प्रमाण ८० टक्के तर शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २४ टक्के जणांचीच आधार नोंदणी करण्यात आली आहे. हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या वयोगटातील आधार नोंदणी वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या ९७ टक्के नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ३६ टक्के आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नोंदणीचे प्रमाण १०० टक्के आहे, तर ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ८५ टक्के आहे. गोव्यामध्ये शंभर टक्के नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. गोव्यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ४८ टक्के आहे. ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ९२ टक्के आहे. आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. मात्र, आधार नोंदणी अत्यावश्यक असल्याने आधार नोंदणीवर भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दररोज सुमारे ३८ हजार आधार नोंदणी केली जाते. आधार नोंदणीला मोबाइल क्रमांक जोडण्याचे प्रमाण ५५ टक्के आहे.शून्य ते ५ वयोगटातील केवळ २६ टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण१३५ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी १२३ कोटी ६० लाख भारतीयांची नोंदणी करण्यात आली आहे.देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८८.७ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.ं५ ते १८ वयोगटांतील ७५.४ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २६टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण