धर्मांतरप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

By Admin | Updated: January 5, 2015 04:27 IST2015-01-05T04:27:23+5:302015-01-05T04:27:23+5:30

आॅस्ट्रेलियन नागरिकांकडून स्थानिकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अखेर रविवारी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली

Complaint filed with the police for conversion | धर्मांतरप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

धर्मांतरप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

चंद्रपूर : आॅस्ट्रेलियन नागरिकांकडून स्थानिकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अखेर रविवारी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
शुक्रवारी सायंकाळी स्थानिक जुनोना चौकातील हिंग्लाज भवानी वॉर्डात असा प्रकार घडल्याची तोंडी तक्रार विश्व हिंंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रामनगर पोलिसात केली होती. मात्र लेखी तक्रार नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर खळबळ उडाली. सकाळी पोलिसांनी या परिसरात जाऊन नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दरम्यान, दुपारी विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अ‍ॅड. हरीश मंचलवार यांंनी रामनगर पोलिसात जाऊन लेखी तक्रार सादर केली. मात्र सुरूवातीला ही तक्रार स्वीकारण्यास पोलिसांकडूृन टाळाटाळ झाली. त्यानंतर तक्रार स्वीकारली गेली असली, तरी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint filed with the police for conversion