'उडता पंजाब' लीक झाल्याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार
By Admin | Updated: June 15, 2016 23:21 IST2016-06-15T22:02:47+5:302016-06-15T23:21:42+5:30
अनेक दिवसांपासून वादात अडकलेला उडता पंजाब हा चित्रपट लीक झाल्याची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला प्राप्त झाली आहे. शुक्रवारी 17 तारखेला चित्रपट सिनेमागृहात झळकणार होता.

'उडता पंजाब' लीक झाल्याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15- अनेक दिवसांपासून वादात अडकलेला 'उडता पंजाब' हा चित्रपट लीक झाल्याची तक्रार पोलिसांच्या सायबर सेलला प्राप्त झाली आहे. उडता पंजाब या चित्रपटाची 40 मिनिटांची क्लिप सोशल मीडियावर लीक झाली असून, या क्लिपमध्ये सिनेमातल्या महत्त्वपूर्ण दृश्यांचं चित्रीकरण दिसतं आहे. तर काही वेबसाइटच्या पोर्टलवर तर पूर्ण चित्रपट असल्याची माहिती आता समोर येते आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. हा चित्रपट लीक झाल्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टानं निर्माता अनुराग कश्यप याला कोणतेही सीन कट न करता चित्रपट प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली होती.
शुक्रवारी 17 तारखेला चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. अभिषेक चौबे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक चौबे यांचा हा तिसरा चित्रपट असून, दिग्दर्शक म्हणून याअगोदर ‘इश्किया’, ‘देढ इश्किया’ हे चित्रपट त्यांनी साकारले आहेत. चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर-खान, आलिया भट्ट आणि पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.