शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच मिळणार नुकसान भरपाई, शेतकऱ्यांचा सण आता गोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:19 IST

farmers : राज्यात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे.

मुंबई : निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्याना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. याबाबत लवकरच परवानगी मिळेल. त्यामुळे पुढील आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळायला सुरूवात होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.राज्यात विधानपरिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खातात पैसे वळते व्हायला सुरुवात होईल. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. यापूर्वीही निवडणूक आचारसंहितेच्या काळात शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली होती. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या रक्कमेचे वाटप करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.राज्यातील मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करून मंदिरांबाबत दिवाळीनंतरच निर्णय होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार