कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू
By Admin | Updated: February 12, 2015 04:14 IST2015-02-12T04:14:05+5:302015-02-12T04:14:05+5:30
तालुक्यातील ग्रामीण परिसरात गोदामाच्या नावाखाली तर काही गोदाम परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे

कंपनीत स्फोट; एकाचा मृत्यू
भिवंडी : तालुक्यातील ग्रामीण परिसरात गोदामाच्या नावाखाली तर काही गोदाम परिसरात विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे बनविण्यात येणाऱ्या वेल्डिंग रॉडच्या कंपनीत बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन लागलेल्या आगीत रामरथ सीताराम राजभर (४५) या कामगाराचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
तालुक्यातील अंजूर रोड-माणकोली येथे चामुंडा कॉर्पोरेशन कम्पाउंडमध्ये वेल्डिंग रॉड बनविणारी प्रीमिअम कंपनी आहे. या कंपनीत वेल्डिंग रॉडसाठी लागणारी पावडर बनवित असताना अचानकपणे सायफ्लोन व डस्ट कलेक्टर मशीनमधील पाइपमधून धूर येऊन स्फोट झाला. या मशीनवर काम करणारा कामगार रामरथ सीताराम राजभर जागीच ठार झाला. तसेच मोहित शर्मा (२०) हा कामगार गंभीर जखमी आहे. तर राजेंद्र राजभर (२५), चंद्रशेखर विश्वकर्मा (३७), त्रिभुवन राजभर (३५), लालबहादूर यादव (२५), अशोक सिंग (२१), दिनेश केवट (२०) व संतोष (२२) हे कामगार जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.
कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्याच्या दृष्टीने मालकाने कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती. आग विझविण्याचे तीन छोटे बाटले संपल्यानंतर कंपनीत लागलेली आग मनपाच्या अग्निशामक दलाने विझविली. (प्रतिनिधी)