दुष्काळमुक्ततेसाठी कंपन्यांचे सहकार्य हवे
By Admin | Updated: January 28, 2015 06:03 IST2015-01-28T05:13:56+5:302015-01-28T06:03:29+5:30
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.

दुष्काळमुक्ततेसाठी कंपन्यांचे सहकार्य हवे
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या दुष्टचक्रातून दुष्काळग्रस्त गावांची कायमची मुक्तता, औद्योगिक आणि कृषी विकासात कॉर्पोरेट कंपन्यांच्या सहभागाची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून मिळविली.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास वाव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित फोरमच्या परिषदेत सांगितले. विदर्भ, मराठवाड्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांनी सहभाग द्यावा, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला कृषी उत्पादनांचे पॅकेजिंग, मार्केटिंग, प्रोसेसिंगसाठी या कंपन्यांच्या सहभागावर त्यांनी भर दिला. राज्यातील ५ लाख शेतकरी जोडले गेले आहेत. ही संख्या लवकरच २५ लाखावर नेण्याचा सोडला .
जलसंधारणाच्या कामामध्ये खासगी कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची कल्पना कंपन्यांनी उचलून धरली. नागपूरमध्ये एकात्मिक टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी शिनिची कोईझुमी या जपानी कंपनीला संपूर्ण सहकार्य शासनाच्या वतीने देवू, अशी हमी त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)