शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दारू दरवाढीस कंपन्यांचा विरोध; सरकारचे समर्थन, निर्णय नाही

By यदू जोशी | Updated: June 19, 2025 13:17 IST

राज्य मंत्रिमंडळाने १० जूनच्या बैठकीत दारूवरील उत्पादन शुल्कात मोठी दरवाढ केली.

यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाने १० जूनच्या बैठकीत दारूवरील उत्पादन शुल्कात केलेली मोठी दरवाढ स्थगित करण्याची आणि १५ ते २० टक्केच वाढ करण्याची मागणी इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाइन्स असोसिएशन ऑफ इंडियाने केल्यानंतर राज्य सरकारने या संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर मंगळवारी दोन बैठका घेतल्या. मात्र, दरवाढीला सरकारने स्थगिती दिलेली नाही.

संघटनेने १२ जूनला उत्पादन शुल्क विभागाला एक पत्र देऊन ही दरवाढ अन्यायकारक असल्याचा आणि दारू विक्रीवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा केला होता. या पत्राची दखल घेत झालेल्या बैठकांना उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख आणि अन्य अधिकारी  उपस्थित होते.

प्रीमियम ब्रँडच्या दारूची किंमत दुपटीने वाढेल, त्यामुळे ग्राहक कमी दर्जाची दारू पिण्यास पसंती देतील?उत्पादन शुल्कवाढीमुळे प्रीमियम ब्रँडच्या दारूची किंमत दुपटीने वाढेल आणि त्यामुळे ग्राहक कमी दर्जाची दारू पिण्यास पसंती देतील व त्यामुळे उत्पादन शुल्काची वसुली कमी होईल. अन्य राज्यांमधून अवैध दारूची आयात वाढेल.

ज्या राज्यांमध्ये असे मोठ्या प्रमाणात दर वाढविले गेले तेथे उत्पादन शुल्कापासून सरकारचे उत्पन्न कमी झाले होते, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. उत्पादन शुल्क दीडशे टक्क्यांपर्यंत वाढविणे अन्यायकारक आहे. सरकारने फार तर १५ ते २० टक्के वाढ करावी.

उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी २०२१-२२ मध्ये केलेल्या दरवाढीचा पॅटर्न स्वीकारावा, तसेच सरकारने या दरवाढीपासून १४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असल्याचा जो अंदाज केला आहे तोदेखील वस्तुस्थितीला धरून नाही, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दरवाढीचे समर्थन - सूत्रांनी सांगितले की, या   बैठकांमध्ये उत्पादन शुल्क खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दरवाढीचे समर्थन केले. अन्य राज्यांमध्ये दारू महाराष्ट्रापेक्षा फारच कमी दरात मिळणार असल्याचा दावा करताना संघटनेने जी आकडेवारी दिली ती अधिकाऱ्यांनी अमान्य केली.

- २०११ मध्ये उत्पादन शुल्क वाढविले होते तेव्हा दारू विक्री दोन टक्क्यांनी कमी झाली; पण उत्पादन शुल्क तब्बल ४५ टक्क्यांनी वाढले होते, हे निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई