नालेसफाईच्या चौकशीसाठी समिती
By Admin | Updated: June 24, 2015 01:50 IST2015-06-24T01:50:33+5:302015-06-24T01:50:33+5:30
विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका आणि राज्य सरकारकडे दाद मागण्याचा भाजपाचा इशाऱ्यामुळे अखेर नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश

नालेसफाईच्या चौकशीसाठी समिती
मुंबई : विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका आणि राज्य सरकारकडे दाद मागण्याचा भाजपाचा इशाऱ्यामुळे अखेर नालेसफाईच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका महासभेत आज निवेदनाद्वारे दिले़ या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे़ त्यानुसार दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे़
मुसळधार पावसाचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत उमटल़ नालेसफाईची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेला या पूरपरिस्थितीसाठी विरोधी पक्षांनी एकीकडे जबाबदार धरले़ त्याचवेळी नालेसफाई चौकशी पालिकास्तरावर न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी दिले़ यामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे़