शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
3
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
4
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
5
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
6
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
7
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
8
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
9
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
10
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
11
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
12
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
13
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
14
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
15
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
16
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
17
Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!
18
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
19
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
20
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!

संमेलनात ग्रंथ प्रदर्शनासाठी समिती

By admin | Updated: September 26, 2016 02:51 IST

साहित्य संमेलन आणि वाद या समीकरणाला छेद देण्यासाठी यंदा अत्यंत साधेपणाने संमेलनाचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई : साहित्य संमेलन आणि वाद या समीकरणाला छेद देण्यासाठी यंदा अत्यंत साधेपणाने संमेलनाचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोंबिवली या ठिकाणी संमेलन स्थळ निश्चिती झाल्यानंतर, आता संमेलनाध्यक्ष, ग्रंथप्रदर्शन अशा सर्व तयारींना सुरुवात झाली आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शन व विक्रीवर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी, यंदा प्रथमच ग्रंथ प्रदर्शनासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे.संमेलनस्थळी भरणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाचा यथायोग्य समन्वय साधण्यासाठी महामंडळाने समिती अंतर्गत या कामाची जबाबदारी सोपविली आहे. त्या समितीत रवींद्र बेडकीहाळ (पुणे), आसाराम लोमटे (मराठवाडा) आणि चंद्रशेखर गोखले (मुंबई) या सदस्यांचा समावेश आहे. ही समिती संमेलन आयोजक, महामंडळ व ग्रंथ व्यावसायिक यांच्या योग्य समन्वय, संवाद व सौहार्द राखण्याचे काम करेल.संमेलनप्रसंगी आयोजित होणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाची जबाबदारी निमंत्रक संस्थेची म्हणजेच, आगरी युथ फोरम यांची असणार आहे. या निमंत्रक संस्थेला ही समिती सहयोग करेल.यंदाच्या संमेलनात दर्शनी, प्रदर्शनात्मक, सादरीकरणात्मक व मुद्रित, दृकश्राव्य वा अन्य कोणत्याही माध्यमातील प्रसिद्धी, प्रचार व निवेदन इ. प्रकारच्या सामुग्रीतून कोणताही केवळ व्यक्तिगत प्रचार प्रसार न घडता, संमेलनाचा दर्जा, गुणवत्ता यांची काळजी घेतली जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)