शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 05:48 IST

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा २०२४ ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारला अहवाल सादर करणारा राज्य मागासवर्ग आयोग हा मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये महत्त्वाचा प्रतिवादी आहे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत स्पष्ट केले.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा २०२४ ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या कायद्याअंतर्गत मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

काही याचिकांमध्ये निवृत्त न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाची स्थापना, आयोगाची कार्यपद्धती आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा अहवाल, या सर्व बाबींना आव्हान देण्यात आले आहे.  या सर्व याचिकांवर शुक्रवारपासून अंतिम सुनावणीस सुरुवात झाली आहे. मराठा समाज मागास नाही, त्यामुळे त्याला आरक्षणाची आवश्यकता नाही, तसेच मराठा आरक्षण कायद्यामुळे राज्याची आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक होईल, असे आक्षेप मराठा आरक्षण कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये घेण्यात आले आहेत. 

न्यायालय काय म्हणाले?एक याचिकादार भाऊसाहेब पवार यांनी मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यासाठी सोमवारी न्यायालयात अर्ज केला होता.  आयोगाच्या अहवालालाच पवार यांनी आव्हान दिले आहे. आयोगाचा अहवाल रद्द करण्याची मागणी त्यांनी केली असल्याने आयोग हा महत्त्वाचा प्रतिवादी आहे, असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या पूर्णपीठाने स्पष्ट केले. 

आयोगाबाबत आज निर्णय  कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांत आयोग महत्त्वाचा आणि आवश्यक प्रतिवादी नसला तरी आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये स्वत:ची बाजू मांडण्यासाठी आयोग महत्त्वाचा व आवश्यक प्रतिवादी आहे, असे न्यायालयाने म्हटले. आयोगाला प्रतिवादी करण्याबाबत बुधवारी आदेश देऊ, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय