भाजपा-राष्ट्रवादीच्या ‘दोस्तान्या’वर टीका
By Admin | Updated: November 13, 2014 00:17 IST2014-11-13T00:17:25+5:302014-11-13T00:17:25+5:30
राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने मदत केली की नाही, हे अद्यापही गुलदस्त्यातच असले, तरी या दोन्ही पक्षांच्या ‘दोस्तान्या’वर सोशल मीडियातून टीका होत आहे.

भाजपा-राष्ट्रवादीच्या ‘दोस्तान्या’वर टीका
पुणो : राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने मदत केली की नाही, हे अद्यापही गुलदस्त्यातच असले, तरी या दोन्ही पक्षांच्या ‘दोस्तान्या’वर सोशल मीडियातून टीका होत आहे. यासाठी सोशल मीडियावर शायरीला बहर आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी चर्चेत मात्र शरद पवार आहेत.
विधानसभेत बुधवारी आवाजी मतदानाने सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर राष्ट्रवादीबरोबरचा भाजपाचा ‘दोस्ताना’ अधोरेखित झाला. यावर एक मेसेज फिरत होता-
कुणी बोलतो फायद्यावर
कुणी बोलतो तोटय़ावर
महाराष्ट्र सरकार चालणार
घडय़ाळाच्या काटय़ावर..!!
ना बाणाच्या टोकावर
ना मोदीच्या लाटेवर
सरकार चालणार फक्त
घडय़ाळाच्या काटय़ावर..!!
ल्लल्ल
राष्ट्रवादीला विरोध म्हणून भाजपाला मतदान करणा:यांनी आपली फसवणूक झाली असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
ल्लल्ल
बीजेपीच्या चड्डीला
राष्ट्रवादीचा पट्टा
फसवून सा:या जनतेला
केली महाराष्ट्राची थट्टा
ल्लल्ल
सोशल मीडियावर दिवसभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करतानाही त्यांच्या ‘पॉवर’चीच चर्चा चालू होती.
ल्लल्ल
हमारे बारे में इतना मत सोचिये,
हम दिलमें आते है
समझ में नहीं - शरद पवार
ल्लल्ल
वो सिकंदरही दोस्त कहलाता है
हारी बाजी को जितना जिसे आता है
डोन्ट अंडरएस्टीमेट दि पावर ऑफ पवार
ल्लल्ल
कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
सापडला सापडला
??
??
बारामतीकरांच्या खिशात आहे
महाराष्ट्रासह भाजपा माझा??
ल्लल्ल
निवडणुकीच्या काळात भाजपाबरोबर जाणार नाही, असे सांगणा:या राष्ट्रवादीबाबत तसेच पवार यांच्या भूमिकेबाबतही टीका होत आहे.
ल्लल्ल
एका झाडावर सरडा आत्महत्या करतो..
चिठ्ठी लिहून ठेवतो की..
रंग बदलण्यात
पवारसाहेब माङयापुढे गेल्यामुळे
वैफल्यग्रस्त मन:स्थितीत मी आत्महत्या करत आहे..
ल्लल्ल
निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे अगदी ठासून सांगत होते. त्यावरही अनेकांनी टीका केली आहे.
ल्लल्ल
पवारसाहेबांचे धोरण आणि अजितदादांचे धरण
ल्लल्ल
‘नॅचरली करप्ट पार्टी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपा समर्थक आता एकदम दादांच्या धरणातील पाण्यालाही तीर्थ समजू लागलेत!
ल्लल्ल
पवारसाहेबांचे धोरण आणि अजितदादांचे धरण म्हणजे काय ते त्यांना आत्ता समजले असेल! 25क्क्क् कोटी खर्च करून, संपूर्ण मीडिया हाताशी धरून आणि मोदींच्या 43 सभा घेऊनही बहुमत मिळाले नाही म्हणून भाजपाने आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याची लाचारी पत्करावी लागली! सेनेला चिथावणी देऊन बाजूला काढण्यामागे पवार यांचेच धोरण होते हे आता गुपित राहिलेले नाही!
ल्लल्ल
काहीही होवो, महाराष्ट्राच्या या मराठी नेत्याने मोदी नावाचे तथाकथित वादळ थोपवून आपल्या खिशात घातले हे मात्र नक्की!
ल्लल्ल
‘‘हे भविष्य माङया हाती..
मी प्रचंड आशावादी ..,
अशी जाहिरात
साहेबांनी का बनवली होती,
हे आता कळतेय.