दमानियांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
By Admin | Updated: April 8, 2017 05:01 IST2017-04-08T05:01:35+5:302017-04-08T05:01:35+5:30
दमानिया यांच्यावर ‘प्रोशेस इश्यू’ जारी करण्याचे आदेश देऊन त्यांना ८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश रावेर न्यायालयाने दिले आहेत.

दमानियांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
रावेर (जि. जळगाव) : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर ‘प्रोशेस इश्यू’ जारी करण्याचे आदेश देऊन त्यांना ८ मे रोजी हजर राहण्याचे आदेश रावेर न्यायालयाने दिले आहेत.
खडसे यांच्याविरुद्ध पुरावे न देता खोटे आरोप करून त्यांच्यासह भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी भाजपाचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी दमानिया यांच्याविरुद्ध २८ जून २०१६ रोजी फौजदारी अर्ज दाखल केला होता. (प्रतिनिधी)