संमेलनाला येणारे साहित्यप्रेमी रिकामटेकडे? नागनाथ कोतापल्ले
By Admin | Updated: November 29, 2014 11:08 IST2014-11-29T11:02:47+5:302014-11-29T11:08:15+5:30
साहित्य संमलेनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणारे साहित्यप्रेमी रिकामटेकडे आहेत का असा सवाल डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी यांनी भालचंद्र नेमाडेंना केला आहे

संमेलनाला येणारे साहित्यप्रेमी रिकामटेकडे? नागनाथ कोतापल्ले
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - साहित्य संमलेनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणारे साहित्यप्रेमी रिकामटेकडे आहेत का असा सवाल डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी यांनी भालचंद्र नेमाडेंना केला आहे. साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग असल्याची टीका नेमाडे यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर कोतापल्ले यांनी नेमाडेंना हा प्रश्न विचारला आहे. तसेच संमलेन जवळ येताच चर्चेत राहण्यासाठी नेमाडे काहीतरी वक्तव्य करत असतात त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.
संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे. संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा शब्दांत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी संमेलनाची खिल्ली उडवली होती.