शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
7
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
8
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
9
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
10
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
11
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
12
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
13
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
14
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
15
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
16
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
17
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
18
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
19
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
20
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

Coronavirus: दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तीन दिवसांत नवे रुग्ण अर्ध्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 07:58 IST

नव्या कोरोनाबाधितांपेक्षा सोमवारी बरे झाले अधिक रुग्ण, राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून  ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. वैद्यकीय तज्ञांनीही रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तविली होती ; मात्र दुसरीकडे राज्यातील दैनंदिन रुग्ण निदान कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. 

राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून  ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते.  सकारात्मक बाब म्हणजे राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४ , २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते. राज्यात बाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार १५१ वर पोहोचली आहे. राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत . सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

दिवसभरात ८० मृत्यूमुंबई १९ , नवी मुंबई ४, कल्याण डोंबिवली २, भिवंडी निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलढाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४ , गडचिरोली १ आणि अन्य राज्य व देशातील एक रुग्णांचा समावेश आहे.

माॅडर्नाचा दावा : लस १०० टक्के यशस्वीवाॅशिंग्टन : काेराेनाच्या गंभीर रुग्णांवर लस १०० टक्के प्रभावी ठरल्याचा दावा ‘माॅडर्ना’ या कंपनीने केला आहे. अमेरिका आणि युराेपमध्ये लसीच्या तातडीच्या वापरासाठी कंपनी अर्ज करणार आहे. ‘माॅडर्ना’ने विकसित केलेल्या लसीच्या चाचणीचे सविस्तर निष्कर्ष सादर केले. ही लस ९४.१ टक्के प्रभावी असून काेराेना रुग्णांची प्रकृती गंभीर हाेण्यापासून १०० टक्के बचाव करण्यात लस सक्षम असल्याचा निष्कर्ष  कंपनीने काढला आहे. चाचणीदरम्यान १९६ काेराेनाग्रस्त रुग्णांनाही लस देण्यात आली हाेती. त्यात ३० रुग्ण गंभीर हाेते. त्यांच्यावर ही लस १०० टक्के प्रभावी ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘फायझर’ या कंपनीने लसीच्या तातडीच्या वापरासाठी अमेरिकेत अर्ज केला आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस