शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबईत या, चांगला शेवट करू"; शिंदेंनी पाठविलेल्या दूताचे मनोज जरांगेंना निमंत्रण, आचारसंहितेचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 11:42 IST

लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

लोकसभेला महायुतीला महागात पडलेले मराठा आरक्षण आता विधानसभेलाही भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलक मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट न करता सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करत आहेत. आधी भुजबळ जरांगेंना प्रत्यूत्तरे देत होते, आता तर फडणवीसही जरांगे यांना आव्हाने देऊ लागले आहेत. अशातच हे आंदोलन विधानसभेपूर्वी मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हालचाली सुरु केल्या असून त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांना दूत म्हणून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर पाठविले आहे. 

केसरकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यांनतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाचा गॅझेटचा मुद्दा कॉमन असून, त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दोघांशी बोलून आंदोलनाविषयी बोलले जाणार आहे. शिंदेंनी दिलेल्या १० टक्के आरक्षणाला कोर्टाने स्टे दिलेला नाही. हे आरक्षण सुरुच आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके याखाली येतात, याचा इंडेक्स विचारात घेऊ. यासाठी आम्ही विशेष अधिवेशन बोलविले आहे, असे केसरकर म्हणाले. 

आचार संहिता लागू होणार आहे.  अनुशेष भरून काढला पाहिजे. स्वतंत्र कमिटी यावर विचार करेल. बहिणीची काळजी आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पाठवले आहे. शिंदे तुमच्याच समाजाचे आहेत. तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे. मला कोकणात गणपतीला जायचे आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्या. मी घरच्या गणपतीला गेलो नाही. माझी फ्लाईट आहे. मला जावे लागेल. त्यासाठी ताईला उपोषण मागे घ्यायला लावा, असे आवाहन केसरकर यांनी आंदोलकांना केले. 

पद गेले तरी चालेल मात्र मुलांना नोकरी लावून देणार, असे शिंदे म्हणाले आहेत. ज्याठिकाणी गंभीर गुन्हे नाहीत ते मागे घेऊ. मात्र घरे जाळले ते गंभीर गुन्हे आहेत. जखमी झाले त्यांना काहीना काही तरी देणार. मुख्यमंत्री तुमच्यासोबत तीन तास बोलले आहेत. आरक्षणाचे श्रेय मनोज जरांगे यांना आहे. मराठवाडा गॅझेट हे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून जाहीर करू. शेवट गोड करायला चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ. सगे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटची मागणी केलेली आहे. मनोज जरांगेंना विनंती आहे की मुंबईत या, चांगला शेवट करू, असेही केसरकर म्हणाले. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे