कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्कर रस्त्यावर येणार

By Admin | Updated: June 30, 2016 02:25 IST2016-06-30T02:25:57+5:302016-06-30T02:25:57+5:30

मुंबईचा विकास इतका झपाट्याने होत आहे की, जुन्या इमारतीच्या जागी मोठ-मोठे टॉवर्स उभे राहत आहे.

Come to the sex workers in Kammathipur | कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्कर रस्त्यावर येणार

कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्कर रस्त्यावर येणार


मुंबई : मुंबईचा विकास इतका झपाट्याने होत आहे की, जुन्या इमारतीच्या जागी मोठ-मोठे टॉवर्स उभे राहत आहे. पण कामाठीपुरासारखा परीसर अजुनही या विकासापासून वंचित आहे. जर येथील विकासाला सुरुवात झाली; तर येथील सेक्स वर्कर त्यांचा व्यवसाय रस्त्यावर येऊन करतील, अशी भिती टिसने अभ्यासलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या शिक्षणसंस्थेने ‘ट्रेसिंग द कॉऊंटर्स आॅफ कामाठीपुरा थ्रु लाईव्ली हुड प्रॅक्टीसेस अ‍ॅण्ड रिडेव्हलप्मेंट एफटर्स’ या विषयाअंतर्गत कामाठीपुरा या मुंबईतील सगळ््यात जुन्या वेश्यावस्तीचे परिक्षण केले आहे.
मुंबईची झपाट्याने होणारी प्रगती कामाठीपूऱ्यातील सेक्स वर्कर आणि तेथे राहणाऱ्या इतर लोकांना कशी त्रासदायक ठरेल? याचा अहवाल त्यांनी तयार केला आहे. कामाठीपूरा रेड लाईट परीसर म्हणून ओळखला जातो. पण तेथे अनेक लघु उद्योग चालतात. पण कामाठीपुरा हे नाव ऐकूनच अनेक लोकांच्या भुवया उंचावतात. या परीसरात मध्यमवर्गीय लोक राहत असून या वस्तीचा त्रास त्यांना देखील होत आहे, असा हा अहवाल म्हणतो. तेथील वस्ती हटवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण येथील वस्ती हटवली तर वेश्या व्यवसाय रस्त्यावर येईल, अशी भिती टीसने व्यक्त केली आहे. शिवाय असे झाल्यास सर्वसामान्यांना अधिक त्रासदायक होईल, असेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या एकमेव भारतीय संस्थेने हा अहवाल तयार केला असून कामाठीपूरासोबत झपाट्याने बदलत चाललेल्या वसई-विरार, चेंबूर, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड अशा परीसरांचा अभ्यासही टीसने केला आहे. (प्रतिनिधी)
>जुन्या वस्तीचे परीक्षण
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या शिक्षणसंस्थेने ‘ट्रेसिंग द कॉऊंटर्स आॅफ कामाठीपुरा थ्रु लाईव्ली हुड प्रॅक्टीसेस अ‍ॅण्ड रिडेव्हलप्मेंट एफटर्स’ या विषयाअंतर्गत कामाठीपुरा या मुंबईतील सगळ््यात जुन्या वेश्यावस्तीचे परिक्षण केले आहे. टीसच्या प्राध्यापिका रतुला कुंडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Web Title: Come to the sex workers in Kammathipur