मंडपात अवतरली प्रेयसी!

By Admin | Published: May 6, 2016 02:53 AM2016-05-06T02:53:56+5:302016-05-06T02:53:56+5:30

लग्नमंडपात येऊन नवरदेव हा आपला प्रियकर असल्याचा दावा प्रेयसीने केल्यामुळे लग्न मोडलेच. शिवाय, नवरदेवाला नवरीच्या वऱ्हाडींनी चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे

Come down to the pavilion! | मंडपात अवतरली प्रेयसी!

मंडपात अवतरली प्रेयसी!

googlenewsNext

साक्री (जि. धुळे) : लग्नमंडपात येऊन नवरदेव हा आपला प्रियकर असल्याचा दावा प्रेयसीने केल्यामुळे लग्न मोडलेच. शिवाय, नवरदेवाला नवरीच्या वऱ्हाडींनी चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या नवऱ्या मुलाचे पहिले पाऊल बुधवारी साक्री पोलीस स्टेशनमध्ये पडले. लग्न मोडल्यानंतर यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
साक्री येथील मुलाचे लग्न वसमार येथील मुलीशी ठरले होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी विवाहाची तारीख निश्चित झाली होती. लग्न म्हसदी येथील देवीच्या मंदिरात लागणार होते. नवरदेव व नवरीकडचे सर्व नातेवाईक लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित होते. तेवढ्यात नवरदेवाची मुंबई येथील प्रेयसी मंडपात हजर झाली. नवरदेवाशी माझे संबंध असल्याचे सांगितल्यावर, उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ही माहिती त्या मुलीने देताच, नवरीकडच्या मंडळींनी नवरदेव मुलाला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली, परंतु समाज बांधवांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शांत केले. त्यानंतर, विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Come down to the pavilion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.