संवेदनशील भागात कोम्बिंग आॅपरेशन
By Admin | Updated: January 21, 2017 01:30 IST2017-01-21T01:30:05+5:302017-01-21T01:30:05+5:30
महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली

संवेदनशील भागात कोम्बिंग आॅपरेशन
पिंपरी : महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्याला भेट देत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रतिबंधात्मक कारवाई जास्तीत जास्त कडक करण्याबाबत सूचना दिल्या.
महापालिका निवडणूक २१ फेबु्रवारीला होत असून, यासाठी मागील आठवड्यातच आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त शुक्ला यांनी शुक्रवारी सकाळी निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्याला भेट दिली. ठाण्यांतर्गत असलेल्या संवेदनशील परिसराची सविस्तर माहिती घेत काय उपाययोजना राबवाव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्यात झालेल्या आढावा बैठकीस सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संवेदनशील परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करण्यासह जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करा, पोलिसांनी गणवेशात असावे याबाबत सूचना आयुक्त शुक्ला यांनी दिल्या. यासह कुठे आणि किती बंदोबस्त लावायचा याबाबत मार्गदर्शन करीत इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली.