दिवाळीसाठी रंगीबेरंगी कंदील बाजारात दाखल

By Admin | Updated: October 20, 2016 03:00 IST2016-10-20T03:00:09+5:302016-10-20T03:00:09+5:30

काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे.

The colorful lanterns are available for Diwali | दिवाळीसाठी रंगीबेरंगी कंदील बाजारात दाखल

दिवाळीसाठी रंगीबेरंगी कंदील बाजारात दाखल


उरण : काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. यामुळे उरणची बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून बाजारपेठेत रंगीबेरंगी असे भारतीय बनावटीचे आकाश
कंदील दाखल झाले आहेत. हे आकाश कंदील घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आकाश कंदीलच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
सध्या भारतीय वस्तूंना स्पर्धक (पर्याय) म्हणून बाजारपेठेत चिनी बनावटीचे साहित्य दिवाळीनिमित्त दाखल झाले असून सुंदर आकर्षक व योग्य किंमत अशी लक्षणे असलेल्या चिनी वस्तूंनी अनेक बाजारपेठा काबीज केल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे चिनी वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे, त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे काही अंशी दिसू लागले आहे. परिणामी नागरिकांनी भारतीय वस्तूंना पसंती दिली आहे. उरणकर दिवाळीसाठी इतर कोणत्याही देशाच्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा भारतीय वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.
जीवनात असलेला अंधार दूर करून जीवन प्रकाशमय करण्याच्या हेतूने दिवाळी साजरी केली जाते. त्या निमित्ताने घरोघरी आकाश कंदील लावण्याची प्रथा रूढ झाली. सध्या आकाश कंदील हे ४० रु पयांपासून ते ५०० रु पयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते संदीप चव्हाण यांनी दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The colorful lanterns are available for Diwali