‘एक्सलेन्स’मुळे रंगला लोकमत कॉर्पोरेट सोहळा
By Admin | Updated: November 19, 2014 05:48 IST2014-11-19T04:42:31+5:302014-11-19T05:48:34+5:30
सामाजिक भान जपत उद्योग-धंद्यात महाराष्ट्र राज्याला अग्रस्थानी नेऊन ठेवणाऱ्या यशस्वी दिग्गज उद्योजकांना लोकमत समूहाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

‘एक्सलेन्स’मुळे रंगला लोकमत कॉर्पोरेट सोहळा
सामाजिक भान जपत उद्योग-धंद्यात महाराष्ट्र राज्याला अग्रस्थानी नेऊन ठेवणाऱ्या यशस्वी दिग्गज उद्योजकांना लोकमत समूहाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. निमित्त होते ते ‘कॉर्पोरेट एक्सलेन्स अॅवॉर्ड’चे. वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एन्डमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका आलिशान समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिग्गजांचा यानिमित्ताने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. उद्योग आणि खाण, सांसदीय कार्यमंत्री प्रकाश मेहता, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, लोकमतचे प्रेसिडेंंट सेल्स करुण गेरा, लोकमतचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट विजय शुक्ला, लोकमतचे एक्झिकेटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट बिजोय श्रीधर, लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट सेल्स अजित नायर, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, एच. आर. विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक बालाजी मुळे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष वसंत आवारे (वितरण), लोकमतचे सहायक संपादक अतुल कुलकर्णी आणि डॉ. आर. एल. भाटीया आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश मेहता आणि डॉ. राजन वेळूकर यांची प्रमुख भाषणे झाली. याप्रसंगी प्रकाश मेहता म्हणाले की, उद्योगांसाठी राज्याकडे अनेक प्रस्ताव आले असून, महाराष्ट्र राज्य हे उद्योगांत क्रमांक १वर पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुळातच महाराष्ट्र उद्योगांत क्रमांक १वर आहे. मात्र तरीही राज्यातील उद्योग-धंदे आणखी भरभराटीला यावेत म्हणून उल्लेखनीय पावले उचलण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्तराचा विचार केला तर उद्योजकांची महाराष्ट्राला पहिली पसंती आहे. मध्यंतरी राज्यात नवे उद्योग आले नाहीत. मात्र आता नवे उद्योग महाराष्ट्रात यावेत म्हणून विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील उद्योगांत ५० हजार कोटींची गुंतवणूक व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून ७५ परवान्यांपैकी १५ परवान्यांबाबतचा निर्णय आम्ही त्वरित घेतला आहे. पुढेदेखील ही प्रक्रिया अशीच सुरू राहील यात शंका नाही. शिवाय भविष्यात महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर देशात सर्वाधिक असेल, असा आत्मविश्वासदेखील मेहता यांनी या वेळी व्यक्त केला. शिवाय केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यातील नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहनही मेहता यांनी केले. राजन वेळूकर या वेळी म्हणाले की, लोकमतने उद्योजकांना गौरविल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून निश्चितच उद्योजकांना प्रेरणा मिळत असून, लोकमतला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. शिवाय स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करताना वेळूकर म्हणाले, या अभियानांतर्गत प्रत्येकाने स्वच्छता मोहीम राबविताना आपले मनदेखील स्वच्छ केले तर आणखी उत्तम होईल. कारण मनाची स्वच्छता ही सर्वांत मोठी असते आणि मन स्वच्छ असेल तर देश स्वच्छ होईल यात शंकाच नाही. (प्रतिनिधी)
संघटनात्मक पुरस्कार
फ्युचर ग्रुपचे संवाद आणि विपणन विभागाचे प्रमुख मदनमोहन मोहपात्रा, पारले प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे समूह उत्पादन प्रमुख मयांक शहा, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे विपणन विभागाचे प्रमुख स्वप्निल जांभळे, विको लायब्रोटोरिजचे संचालक संजीव पेंढारकर, श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रायव्हेट लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, एम्पायर स्पाईसेस अॅण्ड फूड लिमिटेडचे अध्यक्ष हेमंत राठी, घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, पीएनजी ज्वेलर्सचे संचालक सुधीर गाडगीळ, अंकुर सीड्स प्रायव्हेड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक माधवराव शेंबेकर, जैन इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अतुल जैन, विक्रम टी प्रोसेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भावेश पटेल, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास वासुदेव पाटील, जायका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष कुमार काळे, आयडीयल एज्युसिस्टम प्रायव्हेड लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष जगदीश वालावलकर, एकता वर्ल्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मोहनानी, लोढा ग्रुपच्या विपणन विभागाचे सह-उपाध्यक्ष विनायक वैद्य, अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे अध्यक्ष अशोक कतारिया, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, अरिहंत युनिर्व्हसलचे व्यवस्थापकीय संचालक अशोक चज्जेर, किंग इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश जसनानी, लाइफलाइन रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रकाश पाटील, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हलदीपूरकर, नातू परांजपे डेव्हलपर्सचे संचालक समीर नातू, कोहिनूर गार्मेंटसचे सर्वेसर्वा प्रदीप गांधी, अनुरूप ग्रुपचे संचालक नरेंद्र फिरोदिया, डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, लक्ष्मी सेल्स अॅण्ड सर्व्हिसचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील, संजीवन नॉलेज सिटीचे अध्यक्ष पी.आर. भोसले, अवाडे ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश अवाडे, चाटे ग्रुपचे संचालक गोपीचंद चाटे, शमित बिल्डकॉनचे संचालक सुयोग रुणवाल, प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे, सुदर्शन सौरचे संचालक संजय जिंतूरकर, सन्न्या मोटर्स आणि सारा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन मुळये, चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे, आयुर्वेद संशोधनालयचे भागीदार परेश कोल्हटकर, शारंगधर फर्माचे संचालक डॉ. अभ्यंकर, स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्योम प्रशांत, फाल्को डेव्हलपर्स प्रायव्हेड लिमिटेडच्या संचालिका रिता सिंग पटेल, पिनॅकल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गजेंद्र पवार, बुलढाणा अर्बन क्रेडिट को-आॅप.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकेश झमवार, नाईक्स होमिओपॅथीचे संचालक डॉ. उदय नाईक, ठक्कर बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, सुयोजित बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे अध्यक्ष अनंत राजेगावकर, मल्हार कम्युनिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मल्हार, मनराज मारुती मोटर्सचे अध्यक्ष अशोक बेदमुथ्था, अनुप पब्लिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवल राठी, यशोदा एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दशरथ सागरे, कूपर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष फारुक कूपर, हिरा ग्रुपचे अध्यक्ष बाबाशेठ तांबोळी, कृपा औषधालयचे अध्यक्ष राजन दाली, क्लायमॅक्स अॅडव्हर्टायझिंगचे सर्वेसर्वा उदय जोशी, इंटर्टेड अॅडव्हर्टायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सलीम देवळे, कला- कल्पनाचे सर्वेसर्वा संजीव चिपळूणकर, अॅड फाईन अॅडव्हर्टायझर्स कोल्हापूरचे भागीदार अमर पाटील, मल्टीप्रिंट अॅडव्हर्टायझिंग कोल्हापूरचे भागीदार कौस्तुभ नाबर, निर्मिती अॅडव्हर्टायझिंग कोल्हापूरचे अनंत खासबागदार आणि शिरीष खांडेकर, संपर्क अॅडव्हर्टायझर्स कोल्हापूरचे भागीदार मोहन कुलकर्णी आणि सुधीर शिरोडकर, चतुरंग अॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे भागीदार महेश कराडकर आणि प्रशांत कुलकर्णी, अभिषेक अॅडव्हर्टायझिंग अॅण्ड मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष शेळके, गुलाबराव देवकर इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. अनिल पाटील आणि विशाल देवकर, प्रतिसाद कम्युनिकेशन प्रायव्हेड लिमिटेडचे संचालक अभिजित जोग, सुरेखा अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेड लिमिटेडचे संचालक सचिन पाटील, रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रवींद्र मनकानी, पार्डीगाम प्लस प्रायव्हेड लिमिटेडचे संचालक रजत सरकार, झेबॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किरण भट, सिगल अॅडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक समीर देसाई, नोबल पब्लिसिटीचे उपाध्यक्ष सुनील भाटीया, अॅडव्हेंचर अॅडव्हर्टायझिंगच्या संचालिका शिल्पा तनेजा, एमश्लोकच्या संचालिका निधी सिद्धार्थन, पॉप्युलर पब्लिसिटीचे संचालक देवेल भाटीया, अशोक हेल्थ केअरचे सर्वेसर्वा निनाद पंढारकर, संजीत कम्युनिकेशनचे सहसंचालक सुनील छाबरिया, ग्राफेनेचे संचालक विपुल मेहता, व्हर्सेटाईल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद ठक्कर, सोहम ग्रुप/इन्सारा मेट्रो पार्कचे संचालक दीपक वासंदानी, मॅड अॅडव्हर्टायझिंग मुलुंडचे संचालक पीयूष ठक्कर, इस्टेक अॅडव्हर्टायझिंग/ ग्राफिटी मीडियाच्या संचालिका रश्मी शाह, पनवेलकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राहुल पनवेलकर, त्वचा क्लिनिकचे संचालक डॉ. अमित कारखानीस, शाश्वत ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण विसपुते, जी अॅण्ड जी मीडिया प्रायव्हेड लिमिटेडचे संचालक मनोज गुगले, अराईज मीडियाचे संचालक काशिनाथ पवार, रौनक अॅड एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक अमरदीप सिंग, क्लासिक व्हील प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मुनोत.
व्यक्तिगत पुरस्कार
महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राम दोतोंडे, मुंंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर, मॅडिसन मीडियाचे माध्यम संचालक राकेश उपाध्याय, मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सत्पाळकर, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष जोशी, अगरवाल ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अतुल अगरवाल, फॉर्च्युन मोटर्सचे अध्यक्ष विनोद शर्मा, टिपटॉप प्लाझाचे व्यवस्थापकीय भागीदार रोहितभाई शाह, ग्रामीण पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटचे संचालक विजय पवार, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संचालक किरण सोनटक्के, शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे संचालक बचेवार, खुराना सावंत इंजिनीअरिंग कॉलेजचे संचालक राजेंद्र सावंत, त्रिपुरा आयआयटी कॉलेजचे अध्यक्ष उमाकांत होनराव, गणेश रामचंद्र आपटेचे सर्वेसर्वा विनय आपटे, चव्हाण मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम चव्हाण, डी.एस.के. टोयोटाचे व्यवस्थापकीय संचालक शिरीष कुलकर्णी, पी.एन. गाडगीळ अॅण्ड कंपनीचे संचालक सौरभ गाडगीळ, पी. एन. गाडगीळ अॅण्ड सन्सचे संचालक अभय गाडगीळ, कॉटन किंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रदीप मराठे, एम.आय.टी. स्कूल आॅफ गव्हर्मेंटचे संचालक राहुल कराड, म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली संदानसिंग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे, नहार ग्रुपचे उपाध्यक्ष मंजु यागनिग, एचडीआयएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवन, सिद्धीटेक ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत अग्रवाल, कार्ला शुक्ला क्लासेसचे संस्थापक प्राध्यापक आर.डी. शुक्ला. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष सुनील कर्वे, जेटकिंगचे सहसंचालक सिद्धार्थ भारवानी, आयडीया सेल्युलर लिमिटेडचे विपणन विभागाचे अधिकारी संदीप बंगिया, पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सिलई इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दादा गुजर, वास्तुशोध डेव्हलपर्सचे संचालक सचिन कुलकर्णी, सिम्बॉयसिस सोसायटीच्या मुख्य सचिव विद्या एरवडकर, आर.सी.एफ.चे मुख्य महाव्यवस्थापक ए.एन. गंधे, जोंधळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सागर जोंधळे, पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायण, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील, मुंबई महानगर पालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विजय खबाळे-पाटील, पॅरामाईन अॅडव्हर्टायझिंगचे सर्वेसर्वा सी.एस. परमेश्वर, अॅस्ट्रल अॅडव्हर्टायझिंगचे व्यवस्थापकीय संचालक अमित पवार, फर्नाज अॅडव्हर्टायझिंगचे सर्वेसर्वा होमी तलाठी, मेमेस कन्सल्टंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नायर, ग्रेशियस कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय भागीदार केतन फदिया, सारथी अॅड मीडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अमोल धर्मे, आर.सी. पाटील फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रामकृष्ण छत्रपती पाटील, बलिराम वत्तमवार क्लोथ स्टोअर्सचे संचालक बी.एस. वत्तमवार, गणराज अॅडव्हर्टायझिंगचे संचालक साईनाथ अन्नमवार, ओम्कार अॅडव्हर्टायझिंगचे संचालक संजय ठाकरे, पारस अॅडव्हर्टायझिंगचे संचालक शिरीष दलाल, लिबर्टी सुटिंग अॅण्ड शर्टिंगचे मालक राजशेखर गगनहल्ली, झवेरी अॅडव्हर्टायझिंग सर्व्हिसेसचे मालक संदीप झवेरी, पोरे ब्रदर्सचे मालक रविकिरण पोरे.