शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

रंगाचा खर्च कंपन्यांकडून वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:46 IST

जाहिरातींचे पोस्टर्स काढल्याने एसटी बसेसचे विद्रुपीकरण; आचारसंहिता भंग प्रकरणी बारामतीत पहिली कारवाई

- चेतन ननावरे मुंबई : पोस्टर्स व स्टिकर्स काढल्यामुळे बसेसचे झालेले विद्रुपीकरण दूर करण्यासाठी होणारा रंगरंगोटीचा खर्च जाहिरात कंपन्यांकडून वसूल केला जाणार आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी ही माहिती दिली.बारामती आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक पी.एम. शेलार यांच्यावर आचारसंहिता भंगप्रकरणी निलंबनाची पहिली कारवाईकरण्यात आली.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही, एसटी बसेसवर राजकीय जाहिरातींचे पोस्टर्स असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर, जागे झालेल्या एसटी प्रशासनाने तातडीने सर्व एसटीवरील पोस्टर्स व स्टिकर्स काढण्यास सुरुवात केली, तसेच बारामती आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक पी.एम. शेलार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र, यामध्ये शेलार यांचा दोष नसल्याची प्रतिक्रिया कामगारांमधून व्यक्त होत आहेत. मुळात एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून निविदा काढून जाहिराती चिकटविण्याचे आणि काढण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यावर संबंधित जाहिराती काढण्याचे काम कंपनीचे होते. मात्र, कंपनीने काही जाहिराती काढल्यावर उरलेल्या जाहिरातींचे पोस्टर्स काढण्याचे काम कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्यात आल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे.या सर्व उठाठेवीत एसटी बसेसला अवकळा आली आहे. प्रत्येक बससाठी हजारो रुपये खर्च होणार असून, १८ हजार बसेसमधील बहुतांश बसेसची हीच अवस्था आहे. त्यामुळे रंगरंगोटीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, हा खर्च संबंधित कंपनीकडून वसूल केला जाईल, असा निर्वाळा रणजितसिंह देओल यांनी दिला आहे.आयोगाला कर्मचाऱ्यांचे साकडेजाहिराती चिकटविण्याचे आणि काढण्याचे काम कंपनीचे असताना, कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई प्रशासनाने का केली? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून विचारला जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाने कंपनीला आदेश देणे गरजेचे असल्याने, कार्यालयातील संबंधित अधिकाºयावर जबाबदारी ठेवत, कर्मचाºयावरील कारवाई मागे घेण्याचे साकडे कर्मचाºयांनी निवडणूक आयोगाला घातले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ