नागपूर रंगणार संत्रा रंगात
By Admin | Updated: February 13, 2016 20:38 IST2016-02-13T20:37:05+5:302016-02-13T20:38:09+5:30
जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर संत्र्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला आता संत्र्याच्या नारिंगी रंगाचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे.

नागपूर रंगणार संत्रा रंगात
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि,१३ - जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर संत्र्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला आता संत्र्याच्या नारिंगी रंगाचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे.
नागपूर शहरातील सर्व शासकीय इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने, महापालिकेची कार्यालये, शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींना हा रंग देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या शुक्रवारी संमत करण्यात आला.