शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

College in Maharashtra: १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद; परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:23 IST

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागाचे प्रधान सचिव, तंत्रशिक्षण संचालक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन  बैठक घेतली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवून परीक्षाही ऑनलाईनच घेतल्या जाणार आहेत. याशिवाय शाळांमधील बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने औरंगाबाद शहर, रायगड जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. नागपूर शहर आणि हिंगणा, कामठी, कळमेश्वर सावनेर तालुक्यांमधील शाळाही बंद राहणार आहेत. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागाचे प्रधान सचिव, तंत्रशिक्षण संचालक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन  बैठक घेतली होती. या बैठकीत  जिल्हावार कोविड परिस्थिती काय आहे? किती परीक्षा झाल्या आहेत आणि किती परीक्षा बाकी आहेत? वसतिगृहांची काय परिस्थिती आहे? या सगळ्या बाबींची माहिती घेऊन आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सामंत यांनी जाहीर केला.

 ऑनलाईन शिक्षणादरम्यान विजेची समस्या, कोरोना संदर्भातील अडचणी, नेटवर्कची अडचण अशा कारणांमुळे जर विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकले नाहीत तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची खबरदारी आणि जबाबदारी विद्यापीठांची असेल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गोंडवाना, नांदेड, जळगावसारख्या ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने तेथे कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधत स्थानिक पातळीवर नियोजन करून ऑफलाईन परीक्षा कशा घेता येतील याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या आहेत.

वसतिगृहांना लागणार टाळे 

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना आणि पुरेसा वेळ देऊन वसतिगृहे बंद करण्याच्या सूचनाही दिल्या असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण, संशोधनासाठी आले आहेत, त्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळणार आहे.   

ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे, त्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना महाविद्यालये व विद्यापीठांना दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या काही परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे कला शिक्षण संचालनालयाला त्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.    

 - उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस