शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज युवकांना हवे सकारात्मक राजकारण: अमित ठाकरे, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 05:53 IST

अमित ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

लोनाड : महाविद्यालयीन युवक-युवती राजकारणाकडे सकारात्मक बदल घडविण्यासाठी अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या मनाला साद घालण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करणार आहे. त्यामुळे मला चर्चेदरम्यान महाविद्यालयीन युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा मनसे विद्यार्थी सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी गुरुवारी केला.

ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ठाणे जिल्ह्यातील दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी भिवंडी येथील शांग्रीला रिसॉर्ट येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून केला. त्यानंतर ते पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. 

याप्रसंगी मनसे उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उर्मिला तांबे, भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी, मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख संतोष साळवी, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी आदी उपस्थित होते. वाढती फी व आरक्षणामुळे महाविद्यालयांत प्रवेश मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे, म्हणून सर्व महाविद्यालयांत मनसे विद्यार्थी सेनेची स्थापना करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.

‘ग्रामीण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार’ 

वासिंद : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मनविसे पाठबळ देणार असल्याची ग्वाही मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली. मनविसेच्या महासंपर्क पुनर्बांधणी दौऱ्यानिमित्त ठाकरे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. वाढलेली प्रवेश फी, शाळा तसेच कॉलेज व्यवस्थापन यांची मनमानी आणि  विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आदी समस्या सोडविण्यासाठी मनविसेचे पाठबळ असणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे