शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन विद्यार्थी बनताहेत ‘विकी डोनर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 08:48 IST

‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली.

- मनीषा म्हात्रेमुंबई - ‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली. असे विकी डोनर त्याच्या गावातही असल्याचा दावा मेजर बाबा करतो. असे अनेक किस्से बाबांच्या चौकशीतून उघड झाले.स्मशानातील कोळसा आणि फक्त औषधांनीच गर्भलिंग, लिंगबदल, तसेच मूल होण्याचा दावा करणारा मेजर बाबा हरवलेल्यांचाही शोध घेत असल्याचे सांगतो. त्याच्या दरबारातले किस्सेही गंभीर आहेत. मेजर बाबाच्या म्हणण्यानुसार, आयव्हीएफ तंत्रज्ञानाअंतर्गत, टेस्ट ट्यूब बेबी अंतर्गत नागरिकांची फसवणूक होते. हे सांगताना, त्यांनी त्यांच्याच गावातील एका महिलेचे उदाहरण दिले. अशा प्रयोगशाळांना गावातील मुलेच अवघ्या २ ते ३ हजार रुपयांत वीर्य विकत असल्याचा धक्कादायक खुलासा बाबाने केला आहे. त्याच्याकडे येत असलेल्या डॉक्टरांकडून त्याला ही माहिती मिळाली. अशा अनेक वैद्यकीय प्रयोगशाळा नगरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि अन्य ठिकाणी सरासपणे वीर्य खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असल्याचे बाबा सांगतो. त्यामुळे हेदेखील बेकायदेशीर असून, याचाही सखोल तपास होणे गरजेचे आहे.केस कापणाऱ्यांना सौभाग्य सुख नाहीब्युटीशियन महिला या केस कापतात. केस हे महिलांचे सौदर्य असते. ते कापून त्या पाप करतात. म्हणून अशा महिलांना सौभाग्य सुख मिळत नाही, त्यामुळे केस कापू नयेत, असा सल्लाही येथे विधीसाठी आलेल्या महिलांना बाबा देतो.म्हणे ४ दिवसांत घेतला शोध...निकिता साळुंखे ही मुलगी गावातून हरवली होती. बरीच शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अखेर हताश झालेल्या निकिताच्या कुटुंबीयांनी मेजर बाबाकडे धाव घेतली. ‘माझ्या अनुमानावरून अवघ्या ४ दिवसांत तिचा शोध लागला आणि ती पनवलेमध्ये सापडली,’ असा दावा बाबाने केला आहे.११ मुलींनंतर १२वा मुलगा माझ्यामुळे झाला...गावातील एका दाम्पत्याला ११ मुली झाल्या. मुलगा होत नाही म्हणून ते माझ्याकडे आले. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांना १२वा मुलगा माझ्या औषधांमुळे झाला, असा बाबाचा दावा आहे....म्हणून ब्लाउजवर करणीगावातील एका महिलेला मुलगा सासºयाकडून झाला, ही बाब पतीला समजू नये, म्हणून तिच्या ब्लाउजवर करणी केली. त्यामुळे आजपर्यंत ते पतीला समजले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या