पाचपुतेंच्या विरोधात सामूहिक मुंडण
By Admin | Updated: September 8, 2015 01:03 IST2015-09-08T01:03:48+5:302015-09-08T01:03:48+5:30
हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील सुमारे ११ कोटींची थकीत ऊस बिले मिळावीत, या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी माजी

पाचपुतेंच्या विरोधात सामूहिक मुंडण
श्रीगोंदा (अहमदनगर) : हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याकडील सुमारे ११ कोटींची थकीत ऊस बिले मिळावीत, या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर सामूहिक मुंडण केले.
शेतकऱ्यांनी पाचपुतेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोलापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाचपुतेंच्या घरावर मोर्चा काढला. कारखान्याचे कार्यकारी संचालक हिरामण पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
तहसीलदार विनोद भामरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली़ करमाळ्यातील सुमारे २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार ५०० रुपये मेट्रीक टनाप्रमाणे १० सप्टेंबरला धनादेश देण्यात येणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कारखान्यास सहकार्य करावे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक हिरामण पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)