मोरडेवाडी पुलावरील कठडा तुटला
By Admin | Updated: September 20, 2016 01:58 IST2016-09-20T01:58:08+5:302016-09-20T01:58:08+5:30
मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा कठडा तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

मोरडेवाडी पुलावरील कठडा तुटला
मंचर : मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा कठडा तुटल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरून गेलेला हा पूल धोकादायक स्थितीत आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी बबनराव मोरडे व अॅड. सुदाम मोरडे यांनी केली आहे.
मंचर शहरालगत मोरडेवाडी आहे. मोरडेवाडीचा विस्तार वाढत असून, येथे शहरीकरण होऊ लागले आहे. अनेक नवीन बांधकाम प्रकल्प येथे तयार होत आहेत. मोरडेवाडीकडे जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गापासून रस्ता आहे. हा रस्ता अरुंद असून केवळ एकच वाहन पास होते. पुढे गेल्यावर डिंभे धरणाचा उजवा कालवा पार करून मग मोरडेवाडीकडे जावे लागते. मोरडेवाडीकडे जाण्यासाठी या कालव्यावर पूल आहे. या पुलाची दुरवस्था झाली आहे. तेथे लगतच पाणी जाण्यासाठी दुसरा पूल आहे. कालव्यावरील पुलाचा दक्षिणेकडील एक कठडा तुटला आहे. कालव्यातून सध्या पाणी वाहत आहे. तुटलेल्या कठड्याने अपघाताचा धोका वाढला आहे. मागे एकदा शाळकरी मुलगा या ठिकाणाहून कालव्यात कोसळला होता. सुदैवाने तो बचावला गेला होता. मोरडेवाडीकडे जाणारा हा एकमेव महत्त्वाचा रस्ता असून, तेथे सदैव
वर्दळ असते. (वार्ताहर)