शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
3
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
4
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
5
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
6
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
7
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
8
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
9
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
10
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
11
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
12
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
14
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
15
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
16
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
17
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
18
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
19
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
20
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या

राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 05:34 IST

राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे

 मुंबई - मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.

राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. प्रकाश मार्कंड असे या नागरिकाचे नाव आहे. २७ नोव्हेंबरला ते माना येथील प्रवासी निवाऱ्यात आश्रय घेण्यासाठी थांबले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 

पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम  राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही. मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, हवामान विभाग, पुणे

कुठे किती आहे थंडी?

अहिल्यानगर    ९.४ नाशिक    १०.६परभणी    ११.६जळगाव    ११.७नागपूर    ११.७महाबळेश्वर    ११.८गोंदिया    ११.९सातारा    १२ छत्रपती संभाजीनगर    १२.२नंदुरबार    १२.८ मालेगाव    १२.८ वर्धा    १३.५बुलढाणा    १३.६अकोला    १३.६अमरावती    १४.१सांगली    १४.४सोलापूर    १५.२कोल्हापूर    १५.५अलिबाग    १५.८ मुंबई    १७.६ रत्नागिरी    २०.५पालघर    २२.४ 

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान