राज्यात थंडीचा जोर वाढला!

By Admin | Updated: December 28, 2014 01:22 IST2014-12-28T01:22:09+5:302014-12-28T01:22:09+5:30

या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचे किमान तापमान वेगाने घसरले.

Cold rise in the state! | राज्यात थंडीचा जोर वाढला!

राज्यात थंडीचा जोर वाढला!

नागपूर ६.७ अंशांवर
पुणे : या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचे किमान तापमान वेगाने घसरले. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे़ तेथून बोचरे वारे राज्यात वेगाने वाहत असल्याने पुन्हा पारा घसरू लागला आहे. नागपूरचे किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.६ अंश सेल्सिअसने कमी झाले होते. विदर्भाचे तापमान आज सर्वांत जास्त घटले होते.
त्यापाठोपाठ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे तापमान घटले होते. पुढील ४८ तासांत राज्याच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

किमान तापमान
जळगाव १०, कोल्हापूर १५.४, महाबळेश्वर १०.६, मालेगाव ९, सांगली १४.५, सातारा १३.४, सोलापूर १३, मुंबई २१.६, अलिबाग १७.६, रत्नागिरी १८.९, डहाणू १७.१, उस्मानाबाद ९.९, औरंगाबाद ११.४, परभणी १०.२, नांदेड १०, अकोला ८.६, अमरावती १२.२,चंद्रपूर ११, यवतमाळ १०.४.

Web Title: Cold rise in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.