कोल्ड ब्लडेड सिरियल किलर !--...वेताळ मात्र पुरून उरले डॉक्टरला!

By Admin | Updated: August 17, 2016 00:18 IST2016-08-17T00:17:51+5:302016-08-17T00:18:23+5:30

पोळशी संबंधित लाचलुचपतच्या ५० प्रकरणांचा छडा लावू : नांगरे-पाटील

The cold-blooded serial killer! ... | कोल्ड ब्लडेड सिरियल किलर !--...वेताळ मात्र पुरून उरले डॉक्टरला!

कोल्ड ब्लडेड सिरियल किलर !--...वेताळ मात्र पुरून उरले डॉक्टरला!

डॉक्टर म्हणजे देवदूत. डॉक्टर म्हणजे पुनर्जन्म देणारा... पण याच डॉक्टरकीच्या नावाखाली एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहा जणांना ठार करणारा कसाई आढळतो आपल्या वाईत, तेव्हा थरकाप उडतो अवघ्या सातारा जिल्ह्याचा. ०.५ सीसी इतके ‘स्कोलिन’ नावाचे भुलीचे इंजेक्शन दिले तर माणूस शुध्द हरपतो. पण याच भुलीचे तब्बल ३ सीसी इतके औषध इंजेक्शनमधून देऊन सहा जणांचा खून करणारा संतोष पोळ नक्कीच मेडिकल क्षेत्राला बदनाम करणारा. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी ‘माणुसकीला काळिमा’
फासणारी घटना घडल्यानंतर ‘लोकमत टीम’ने सादर
केलेला हा ‘आॅन दि स्पॉट’ रिपोर्ट....

पोळशी संबंधित लाचलुचपतच्या
५० प्रकरणांचा छडा लावू : नांगरे-पाटील
वाई : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता वाई पोलिस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला़ नांगरे-पाटील यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले़ त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली़ त्यांनी धोम येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या़
त्यापूर्वी पोलिस अधीक्षक संदीप पाटील सकाळी अकरा वाजता वाई पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे, दीपक हुंबरे, पद्माकर घनवट, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


भलेभले अधिकारी कामाला...
...वेताळ मात्र पुरून उरले डॉक्टरला!
बावधन : वाईतील मंगल जेधे खून प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला संतोष पोळ हा बोगस डॉक्टर असून, त्याने अनेक भानगडी केल्याचे उजेडात येत आहे.
पोळ याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचे समोर येत आहे. धक्कादायक माहिती अशी की, त्याने आजवर तब्बल ५१ शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या कारवाईत अडकवले आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वाईचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, उपनिरीक्षक दिवंगत राजेश नाईक यांनाही अडकवण्याचा प्रयत्न पोळ याने केला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे यांनी एका प्रकरणात पोळ याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दीपक हुंबरे लाचलुचपतच्या कारवाईत अडकले होते. यात पोळ साक्षीदार होता.
जेधे यांच्या खुनानंतर वाईचे विद्यमान पोलिस निरीक्षक विनायक वेताळ पोळच्या मागे लागले होते. त्यांना गुंगारा देण्यासाठी पोळने स्वत:वर वार करून घेतले होते. तसेच वेताळ यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यातून आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती. मात्र, वेताळ यांनी कडक भूमिका घेत पोळला अटक केली.
पोलिस अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचवण्याचे प्रयत्न पोळ याच्याकडूनच होत असल्याने आजवर त्याच्यावर संशय असूनही कारवाई होत नव्हती. मात्र, विनायक वेताळ अपवाद ठरले. त्यांनी पोळच्या मुसक्या आवळल्याने वाई हत्याकांडाचा छडा लागला.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे नागरिकांमधून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)


पुराव्यांसाठी
सहा जणांचे
विशेष पथक
शिरवळ : वाईच्या तपास अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी शिरवळ, भुर्इंज, सातारा, पाचगणी येथील पोलिस ठाण्यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नेमणूक पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली.
यामध्ये शिरवळचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खरात, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांचे वाचक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जाधव, भुर्इंजचे पोलिस हवालदार विश्वास देशमुख, विकास गंगावणे, चंद्रकांत जाधव, पाचगणीचे पोलिस हवालदार मारुती इथापे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)


वनिताचा मृतदेह काही आढळलाच नाही...

काकीला गाडून लावले झाड

नथमल भंडारींसाठी ‘आयजीं’चा फोन...

बिच्चारी सलमाही सुटली नाही...

पे्रयसीसाठी खणलेला खड्डा मोकळाच...

मंगल मात्र त्याच्यासाठी शेवटचा बळी

पहिला बळी वडवलीच्या सुरेखाचा...

Web Title: The cold-blooded serial killer! ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.