मासेमारी नौकांना सांकेतिक रंग
By Admin | Updated: March 14, 2015 05:36 IST2015-03-14T05:36:20+5:302015-03-14T05:36:20+5:30
समुद्रातील सागरी सुरक्षा अधिक बळकट व सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गृहविभागाने पालघर-मुंबईसह सात जिल्ह्यांतील सर्व मासेमारी नौकाना वेगवेगळे
मासेमारी नौकांना सांकेतिक रंग
हितेन नाईक, पालघर
समुद्रातील सागरी सुरक्षा अधिक बळकट व सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गृहविभागाने पालघर-मुंबईसह सात जिल्ह्यांतील सर्व मासेमारी नौकाना वेगवेगळे सांकेतिक रंग (कलर कोड) लावण्याचे आदेश दिले असून २६/११ सारख्या समुद्री मार्गाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल. येथील सर्व मच्छीमारांनी त्यांची अंमलबजावणी केली आहे.
परकीय नौका सहज ओळखता यावी म्हणून मुंबई शहरातील नौकाना फ्लोरोसंट पिवळा रंग, मुंबई उपनगरासाठी फ्लोरोसंट तपकीरी, ठाणे जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट निळा, पालघर जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट जांभळा, रायगड जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट लाल, रत्नागिरी जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट गुलाबी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फ्लोरोसंट नारिंगी रंग निश्चित करण्यात आला आहे. नौकेच्या कडेवरील पेरच्या, बडोद, लाफा इ. वर सहा इंचाच्या कलरपट्टा लावण्याचे आदेश सहा. मत्स्यव्यवसाय संचालक रविंद्र वायडा यांनी संबंधित सहकारी दिले आहेत.
आपल्या नौकावरील कलरकोड करण्यास चालढकल करणाऱ्या संस्थाचा २०१५-१६ साठीचा डिझेल कोट्याच्या मंजुरीचा प्रस्तावाची जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाकडून शिफारस केली जाणार नसल्याचे कळविले आहे.
पालघर, डहाणू तालुका
हा एकेकाळी स्मगलिंगसाठी सोयीचा कि नारा म्हणून ओळखला जात
होता तर आज तारापुर अणुउर्जा प्रकल्प, डहाणू थर्मल पॉवर, तारापूर औद्योगिक वसाहत या संस्थांमुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. पालघर व डहाणू या दोन्ही तालुक्यांमध्ये सुमारे २ ते ३ हजार मच्छीमार नौका आहेत.