किनारी वीजवाहिन्या भूमिगत करणार

By Admin | Updated: June 10, 2016 03:29 IST2016-06-10T03:29:06+5:302016-06-10T03:29:06+5:30

नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.

The coastal vigilance will go underground | किनारी वीजवाहिन्या भूमिगत करणार

किनारी वीजवाहिन्या भूमिगत करणार


वसई : नैसर्गिक आपत्तीपूर्वी उपाययोजना करण्यासाठी समुद्र किनाऱ्यालगतच वीजवाहिनी भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. त्यामुळे वसईकर ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीला यश आले आहे.
वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गावात गेल्या कित्येक दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होत आहे. जीवघेण्या उन्ह्याळ्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत विज पुवठा खंडीत होत असलमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कमी दाबाने पुरवठा होत असल्यामुळे उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत.
त्यामुळे निर्मळ, भुर्इंगाव, गास, वाघोली, कळंब या गावांना नालासोपारा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सनसिटी उपकेंद्रातून करण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ वसईचे अधिक्षक अभियंता अरुण पापडकर यांना भेटले होते. १९७० साली उभारण्यात आलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. त्यावेळचे पोल, फिडर, ट्रान्सफार्मर, तारा, डिओ आज अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. या यंत्रणेने आजर्पंत अनेक ग्रामस्थांचे बळी घेतले आहेत. उच्च दाबाचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तर त्यांच्या भाराने खांब वाकलेले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त दाब पडलमुळे ट्रान्सफार्मर वारंवार बंद पडत आहेत. आदि बाबी पापडकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्यात. नानभाट अटाळी आळी येथील ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी तुस्कानो यांनी लावून धरली.त्यावर आपण स्वत: सर्व परिसरात पाहणी करू व आवश्यक त्या बाबींची युद्धपातळीवर दुरुस्ती करू.
निर्मळ दोडती आळीत व नानाभाट अटाळी आळीत मोठ्या क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्यात येईल तसेच निर्मळ, भुईगांव, वाघोली, कळंबला सनसिटीतून पुरवठा करणत येईल अशी ग्वाही पापडकर यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)
>अडीच किमीची मर्यादा
एनआरसीएचए’ नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत समुद्र किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर परिसरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. अशी माहितीही पापडकर यांनी दिली.

Web Title: The coastal vigilance will go underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.