अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद

By Admin | Updated: March 23, 2017 03:08 IST2017-03-23T03:08:42+5:302017-03-23T03:08:42+5:30

अश्लील शेरेबाजी करून कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तटरक्षक दलाचे सतीश खरात

Coast Guard Officer Zarband | अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद

अश्लील शेरे मारणारा तटरक्षक दलाचा अधिकारी जेरबंद

मुंबई : अश्लील शेरेबाजी करून कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली तटरक्षक दलाचे सतीश खरात यांना बुधवारी दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकेच्या कारवाईमुळे तटरक्षक दलात खळबळ उडाली आहे.
तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयात खरात हा केटरिंग विभाग सांभाळतो. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या २९ वर्षीय महिलेने त्याच्याविरुद्ध १८ मार्च रोजी तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षभरापासून खरात महिलेला त्रास देत होता. ही बाब १७ मार्च रोजी महिलेच्या पतीला समजताच या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली. बुधवारी दुपारी खरातला महिलेवर अटक केली.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली. तटरक्षक दलाअंतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Coast Guard Officer Zarband