युतीचं ठरलं...महापालिका एकत्र लढणार

By Admin | Updated: March 25, 2015 16:16 IST2015-03-25T15:45:25+5:302015-03-25T16:16:00+5:30

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या शिवसेना - भाजपाने आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

The coalition's alliance ... the municipal corporation will fight together | युतीचं ठरलं...महापालिका एकत्र लढणार

युतीचं ठरलं...महापालिका एकत्र लढणार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या शिवसेना - भाजपाने आता महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बुधवारी बैठक झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी युती अभेद्य असल्याची घोषणा केली आहे. 

नवी मुंबई व औरंगाबाद महपालिका निवडणुकीचा कार्यक्रम झाला असून २२ एप्रिल रोजी या महापालिकांसाठी मतदान होणार आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत स्वतःचे नशीब आजमावून बघितले. मात्र मतदारांनी दोन्ही पक्षांना एकहाती सत्ता दिली नाही व शेवटी सत्तास्थापनेसाठी शिवसेना व भाजपाला एकत्र यावे लागले. आता राज्यात भाजपा - शिवसेना युतीचे सरकार असले तरी एकमेकांवर कुरघोडी एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र राहणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

बुधवारी उद्धव ठाकरे व रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नेत्यांचे युतीवर एकमत झाले. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेना - भाजपामध्ये जागावाटपात ५० - ५० फॉर्म्यूलावर संघर्ष सुरु आहे. यामुळे पक्ष नेत्यांचे एकमत झाले तरी स्थानिक पातळीवरील नेते युतीसाठी तयार आहेत का हा मोठा प्रश्न आहे. 

Web Title: The coalition's alliance ... the municipal corporation will fight together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.