शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टेंडरविनाच दिली आहेत कोळसा वाहतुकीची कंत्राटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:39 IST

महाजनकोच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर केंद्रांत एक वर्षापासून महाघोटाळा सुरू

- सोपान पांढरीपांडेनागपूर : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या खरेदी/कामासाठी निविदा (टेंडर) मागविणे कायद्याने बंधनकारक असताना, महाराष्ट्र राज्य वीजेनिर्मिती कंपनी (महाजनको) मात्र टेंडरविनाच कोट्यवधींची कोळसा वाहतूक कंत्राटे काही विशिष्ट वाहतूकदारांना वाटत आहे. महाजनकोच्या कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या तीन केंद्रांत हा महाघोटाळा एक वर्षापासून सुरू आहे.‘लोकमत’ने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघड झाला. बहुतेक वीज केंद्रांत कोळशाचा तुटवडा नेहमीच असतो. त्याचा फायदा उठवत या तीन वीज केंद्रांचे मुख्य अभियंते केंद्र सुरू ठेवण्यासाठी तातडीने ट्रकद्वारे कोळसा वाहतुकीची परवानगी मुख्यालयाकडून मागतात. सोबत हे अभियंते काही विशिष्ट वाहतूकदारांना एखादी खाण ते वीज केंद्र अशी वाहतूक करण्यासाठी प्रति टन/प्रति कि.मी. अमूक दराने तयार आहात का? अशी विचारणा करीत. वाहतूकदाराने संमती देताच त्याची एक प्रत मुख्यालयाला पाठवून त्यालाच कंत्राट देण्याची परवानगी मागत. ती मिळताच वाहतूकदाराला एक वर्षासाठी कंत्राट दिले जाते.महाजनको या कंत्राटदाराला जो दर देऊ करते, त्यात खरी गोम आहे. उदा. उमरेड ते कोराडी या ६० कि.मी. अंतरासाठी रु. ४.४० प्रति टन प्रति कि.मी. असा दर दिला आहे. वाहतूक क्षेत्रातील सूत्रानुसार ३.५० ते ३.७५ रुपये प्रति टन प्रति कि.मी. या दराने कुणीही वाहतूक करण्यास तयार होईल, परंतु प्रत्यक्षात कंत्राटदाराला जादा दराने काम दिले जात आहे. यात सार्वजनिक पैशाचा चुराडा होत आहे.तसेच तात्कालिक तुटवड्यासाठी ही कंत्राटे दिली असतील, तर ती एक वर्षाच्या दीर्घ मुदतीसाठी कशी दिली जाऊ शकतात, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. अशाप्रकारे पहिले वाहतूक कंत्राट एप्रिल, २०१८मध्ये कोराडी केंद्राने दिले व त्यानंतर खापरखेडा व चंद्रपूर येथील वीज केंद्रांनीही अशीच कंत्राटे दिली. विशेष म्हणजे, ही तिन्ही वीज केंद्रे कोळसा खाणींपासून नजीक अंतरावर स्थित आहेत.या प्रकरणाबाबत महाजनकोची बाजू जाणून घेण्यासाठी या तिन्ही केंद्रांच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधला, पण कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार झाले नाही. या कंत्राटांना महाजनकोचे मुख्यालय परवानगी देते, म्हणून ‘लोकमत’ने महाजनकोच्या मुंबईच्या वांद्रे येथील मुख्यालयातील मुख्य जनसंपर्क अधिकारी महेश आफळे, मुख्य अभियंता (इंधन व्यवस्थापन), पी. एम. निखारे व कार्यकारी संचालक (कोल) आर.पी. बुरडे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही प्रतिसाद दिला नाही.सात कंपन्यांवर मेहरबानीसध्या कोराडी व खापरखेडा केंद्रात चंद्रा कोल लॉजिस्टिक्स, पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनी, साकार इन्फ्रा निर्माण, एम.एफ. नैन ट्रान्सपोर्ट, खंडेलवाल अर्थ मुव्हर्स अशा कंपन्यांना ठेके दिले आहेत, तर चंद्रपूरमध्ये कॅलीबर ट्रान्सपोर्ट कंपनी व अवनीश लॉजिस्टिक्स या कंपन्या वाहतूक करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूर