सहसरकार्यवाहपदी व्ही. भगय्या यांची वर्णी
By Admin | Updated: March 16, 2015 02:41 IST2015-03-16T02:41:39+5:302015-03-16T02:41:39+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१५-१६ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. सलग तिस-यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या

सहसरकार्यवाहपदी व्ही. भगय्या यांची वर्णी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१५-१६ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. सहसरकार्यवाहपदी सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे हे कायम असून, या पदावर व्ही. भगय्या यांचीदेखील वर्णी लागली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मूळचे हैदराबाद येथील भगय्या यांच्याकडे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे आता सहसरकार्यवाहपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भगय्या यांच्याऐवजी स्वत रंजनजी यांची बौद्धिकप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख म्हणून महावीर यांच्या जागेवर मुकुंदा सी.आर. यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय शारीरिक प्रमुख अनिल ओक यांच्याकडे सहव्यवस्थाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या जागेवर मराठवाड्यातील सुनील कुळकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. संपर्क प्रमुख हस्तिमल यांच्याऐवजी हे पद अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)