शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:03 IST

एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्देआरबीआय गव्हर्नरांशी झालेल्या बैठकीत दिले मागण्यांचे निवेदनइतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली होईल उपलब्ध विलिनीकरण झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा

पुणे : आर्थिक अडचणीतील नागरी सहकारी बँकेला एखाद्या नागरी सहकारी बँकेत विलिन करुन घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकाहून अधिक नागरी बँकांना त्यांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) द्यावी अशा महत्त्वाच्या मागणीसह गुरुवारी (दि. २७) आठ पानी निवेदन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना देण्यात आले. बँकेच्या काही शाखांचे विलिनीकरण करुन घेण्याबाबत दास यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नर पदावरील सर्वोच्च अधिकाऱ्याने सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबई येथील आरबीआयच्या मध्यवर्ती इमारतीत झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक अ‍ॅण्ड क्रेडीट सोसायटीचे (नॅफकॅब) अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दिल्ली को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवदास आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील सिंघानी आणि टास्क फोर्स फॉर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकचे (टॅफकब) प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.  आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरी सहकारी बँकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नागरी सहकारी बँकांची तयारी आहे. मात्र, कोणत्याही एका बँकेला संपूर्ण बँक विलिनीकरण करुन घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडचणीतील बँकेचा सर्व तोटा एकटी बँक सहन करु शकणार नाही. त्यामुळे एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली. तसे झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा मिळेल. तसेच, इतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली उपलब्ध होईल. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी दिली. ---------------------गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नरने सहकारी बँकींग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. सध्याचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी यापुर्वी तमिळनाडू सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबादारी सांभाळली आहे. त्यामुळे ते सहकारी बँकांच्या अडचणी नक्कीच समजून घेतील असा विश्वास वाटतो. विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ

टॅग्स :PuneपुणेbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक