गोहत्याबंदी कायदा होणार !
By Admin | Updated: November 3, 2014 03:24 IST2014-11-03T03:24:26+5:302014-11-03T03:24:26+5:30
गोहत्याबंदी कायद्याचे विधेयक मंजूर झाले असून, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना आम्ही विनंती करूआणि हा कायदा अंमलात आणू, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.

गोहत्याबंदी कायदा होणार !
पंढरपूर : गोहत्याबंदी कायद्याचे विधेयक मंजूर झाले असून, त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. त्यासाठी राष्ट्रपतींना आम्ही विनंती करूआणि हा कायदा अंमलात आणू, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करण्यासाठी खडसे रविवारी पंढरपुरात आले. अंधश्रद्धा कायदा अबाधित राहणार आहे, तो रद्द करण्याचा प्रश्न नाही. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक स्पष्ट करण्यासाठी त्याची व्याख्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. मोठ्या धनिकांकडून त्यांच्या उत्पन्नातील दोन टक्के भाग सामाजाच्या विकासासाठी देण्याचा कायदा आहे. त्याद्वारे हजारो कोटींचा निधी केंद्राकडे जमा होतो. न्यायालयाच्या निर्णयानुसार सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) हा कायदा झाला असून, त्यातून पंढरपूरच्या विकासासाठी निधी मागितला आहे. त्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलणे झाले आहे. पंढरपूर विकासाचा आराखडा तयार केल्यावर मंत्री गोयल स्वत: त्यावर निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)