शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:20 IST

प्रकाश आंबेडकरांचा आरोप : विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा

मुंबई : विविध चौकश्यांचा ससेमिरा लावून विरोधीपक्षातील नेत्यांना संपविण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवित आहेतच, शिवाय पक्षांतर्गत विरोधकही त्यांच्या निशाण्यावर आहेत. चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मंडळी आता गप्प आहे, कारण सर्वांनाच ब्लॅकमेलिंगची भीती आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

राज्य सहकारी बँकप्रकरणी अजित पवार यांच्यासह अन्य विरोधकांच्या चौकशीची जी वेळ साधली आहे; त्यात राजकारणाचा वास येतो आहे. एक-एक करून विरोधकांना संपविण्याचे सरकारचे धोरण आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भातील अहवाल का प्रकाशित केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

पी. चिदम्बरम आदी विरोधी नेत्यांच्या चौकशीचे हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंत पोहचणार आहे. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे, असेही आंबेडकर म्हणाले. आपल्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्यात आला पण त्याला पुरून उरल्याचे आंबेडकर म्हणाले.वंचितची सत्ता आल्यास एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ , क्रिमिलेअरची अट काढण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला जाईल. ओबीसींसाठी स्वतंत्र बजेट करून विद्यार्थ्यांना फ्री-शीप आणि स्कॉलरशीपचा निर्णय घेऊ, असे आश्वासनही आंबेडकर यांनी दिले.

आघाडीसाठी काँग्रेसला अल्टिमेटमएमआयएमसोबत आमची युती कायम आहे. लवकरच जागा वाटपही होईल. काँग्रेसला आघाडीसाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत आहे. आता आघाडीसाठी जास्त काळ थांबणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस