उत्सवांसाठी कायद्यात बदल करू मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By Admin | Updated: July 8, 2015 01:39 IST2015-07-08T01:39:25+5:302015-07-08T01:39:25+5:30

मुंबईतील गणेशोत्सव उत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून, ते साजरे झाले पाहिजेत. आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

CM will make changes in law for festivals | उत्सवांसाठी कायद्यात बदल करू मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उत्सवांसाठी कायद्यात बदल करू मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव उत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून, ते साजरे झाले पाहिजेत. आवश्यकता असल्यास कायद्यात बदल करू. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल . वाहतूक नियोजन केले जाईल तसेच त्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात येईल व सरकार न्यायालयात स्पष्ट भूमिका मांडेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
भाजपाच्या सांस्कृतिक जनाधिकार समितीचे प्रमुख सुनील राणे यांच्यासह भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आ. आशिष शेलार या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे गणेशोत्सव मंडळांमधील संभ्रमाबाबत चर्चा करून समितीचे म्हणणे ऐकून घेता यावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: CM will make changes in law for festivals